pune 
पुणे

मागेल त्याला स्वस्त आणि सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे धोरण : बावनकुळे

सकाळवृत्तसेवा

पुणे : सौरवीज प्रकल्पामुळे राज्याचा कायापालट होणार असून 2022 पर्यंत संपूर्ण कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यायोगे शेतकऱ्यांना दिवसा, स्वस्त व शाश्वत वीज मिळणार असून क्राॅस सबसीडीचा भार कमी होणार असल्याने औद्योगिक व वाणिज्यक स्वस्त होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश बापट होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, ''राज्य भारनियमनमुक्त झाल्यानंतर आता भविष्याच्या दृष्टीने अपारंपारिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी सौरऊर्जा अतिशय महत्वाची आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे. येत्या वर्षभरात सुमारे 7 लाख 50 हजार कृषीपंपांना या योजनेद्वारे वीजरपुरवठा सुरु होणार आहे. राज्यातील 1500 नळ पाणी पुरवठा योजना सौरऊर्जेवर सुरु असून यंदा आणखी 2000 नळ लवकरच सौर ऊर्जेवर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सौर ऊर्जेमुळे शाश्वत आणि स्वस्त वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जेचे दर कृषीपंपांसाठी 2 रुपये72 पैसे असे आले आहेत. ते येत्या वर्षभरात एक रुपयाने स्वस्त होतील. त्यामुळे कृषीपंपांचे वीजदर तीन रुपयांनी कमी होणार असल्याने क्राॅस सबसीडीचा औद्योगिक ग्राहकांवरील भारही कमी होणार आहे. त्यामुळे औद्योगिक व वाणिज्यक ग्राहकांचे वीज दर थेट 3 रुपयांनी कमी होणार आहेत. या शासनाच्या कार्यकाळात कृषीपंपांना साडेसात लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येत असून त्यातील 5 लाख 18 हजार कृषीपंपांचे प्रलंबित वीजजोडण्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे तर उर्वरित वीजजोडण्यासांठी उच्च दाब वितरण प्रणाली(एचव्हीडीएस) योजना सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

विजेप्रमाणे चपळ व कार्यक्षममंत्री  
पालकमंत्री गिरीश बापट यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विजेप्रमाणे चपळ व कार्यक्षम मंत्री म्हणून गौरव केला. गेल्या 4 वर्षात हे राज्य भारनियमनमुक्त करून विजेच्या संकटावर कधी मात करायची आणि मार्ग काढण्याचे कसब फक्त ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यातच असून पवनऊर्जा, सौरऊर्जेकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कार्यक्षम मंत्र्यांमध्ये श्री. बावनकुळे हे अग्रक्रमावर असल्याचे गिरीश बापट म्हणाले.

भाजप-सेनेच्या काळात खऱ्या अर्थाने राज्य भारनियमनमुक्त करण्याचे काम ऊर्जावान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचे जलसंपदा राज्यमंत्री. विजय शिवतारे म्हणाले. सौरऊर्जेमुळे रोजगार वाढेल, वीज बचत होईल व राज्याचे उत्पन्न वाढेल अशी महत्वपूर्ण भूमिका बावनकुळे यांची असल्याने ''देश बदल रहा है'' या वाक्याला साजेसे त्यांचे काम असल्याचे शिवतारे म्हणाले.

महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये म्हणाले, की गेल्या 4 वर्षात ऊर्जामंत्र्यांच्या नेतृत्वात महाऊर्जाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. फक्त योजनांपर्यंत महाऊर्जाची व्याप्ती नाहीतर योजना तयार करणे, त्या राबवणे व धोरणांची अंमलबजावणी करणे हेही महाऊर्जाचे काम आहे. महाऊर्जाला खऱ्याअर्थाने आकार देण्याचे काम ऊर्जामंत्र्याच्या काळात आणि त्यांच्याच नेतृत्वात झाल्याचे लिमये म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नवीन इमारतीबद्दल सविस्तर माहिती अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. या इमारतीची रचना कशी असेल याबद्दल एक चित्रफित याप्रसंगी दाखविण्यात आली. कार्यक्रमाला महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक महेश आव्हाड, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे इतर वरिष्ठ अधिकारी वनागरिक उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT