pune
pune 
पुणे

सीबीआयवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता : शरद पवार

उमेश घोंगडे

पुणे : सीबीआयला वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात ज्या व्यक्तीचा सीबीआयवर विश्‍वास नाही. अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत बोलत होते. भारतीय राज्य घटनेवर हल्ले करणारेच दुर्देवाने सत्तेत आहेत. अशा लोकांनी सत्तेतून दूर करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारवर पवार यांनी सडकून टीका केली. राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्य तीव्र असून राज्य सरकार ठोस काहीच उपाययोजना करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी तीव्र होत जाणार आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला बसतो. लोकांच्या अडचणीत धावून न जाणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. 

प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व नेते उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT