mahavitaran
mahavitaran 
पुणे

 भोर शहरासह 60 गावांची बत्ती गुल 

ज्ञानेश्वर रायते

भाटघर उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षात पाणी शिरल्याचा फटका 
पुणे : भोर तालुक्‍यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना महापारेषणच्या 132/22 केव्ही उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरल्याने सोमवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागला. परिणामी भोर शहरासह 60 गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे, अशी माहिती महावितरणच्या बारामती परिमंडलाच्या वतीने आज देण्यात आली. 
भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी (ता. 4) दुपारपासून धरणाच्या स्वयंचलित 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, धरणालगतच असलेल्या भाटघर जलविद्युत केंद्रातील 132/22 केव्ही उपकेंद्रामध्ये आज सकाळी आठच्या सुमारास पाणी शिरले. नियंत्रण कक्षामध्ये पाणीच पाणी झाले. या उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्वच पाचही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे भोर शहरासह माळवाडी, नऱ्हे, भाटघर, संगमनेर, वडगाव (डाळ), शिरवली, वाठार, नांदगाव, सांगवी, पिलाणेवाडी, माणुसदरा, आंबेघर आदी 60 गावांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. 

प्रयत्न युद्धपातळीवर 
महापारेषणच्या उपकेंद्राच्या नियंत्रण कक्षामधील पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यासाठी अजून दोन दिवस लागतील. या परिस्थितीत महावितरणकडून भोर शहर व 59 गावांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ आणि पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील वीजवाहिन्यांद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, पूरपरिस्थिती गंभीर होत असल्याने पर्यायी वीजपुरवठ्यामध्ये अडथळे येत आहेत. याबाबत बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी माहिती घेऊन भोर व लगतच्या गावांना तातडीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण आदींसह 60 कर्मचारी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदार संग्राम थोपटे यांनीही भाटघर उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. 

सहकार्य करण्याचे आवाहन 
पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये महावितरणचे अभियंता व कर्मचारी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत असून, वीजपुरवठा बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT