Pradeep Kurulkar drdo scientist whatsapp chat pakistan zara Brahmos agni missile  esakal
पुणे

Pradeep Kurulkar : तू इथे आल्यावर ब्रह्मोसचे डिझार्इन रिपोर्ट दाखवतो...

डॉ. प्रदीप कुरुलकर आणि पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट झाले आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅटिंग समोर आले आहे. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या अग्नी ६, मिसार्इल लाँचर, एमबीडीए, ब्रह्मोस आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल (एसएएम), इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि डीआरडीओच्या कामांची माहिती डॉ. कुरुलकर याने झारा हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरविल्याचे एटीएस तपासात निष्पन्न झाले आहे.

तर त्याने झारा हिला सरफेस टू एअर मिसाइल, ब्रह्मोस, अग्नी ६, मिसार्इल लाँचर, एमबीडीए आदी क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, इंडियन निकुंज पराशर याबाबत चॅटिंग केली आहे. त्यातील काही फोटो व माहिती डिलीट करण्यात आली आहे. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान वेळोवेळी केलेले चॅटिंग एटीएसने न्यायालयात दोषारोपपत्राच्या माध्यमातून सादर केले आहे.

झाराने विचारले, ब्रह्मोस हे तुझे इनव्हेशन आहे का? असे विचारल्यावर डॉ. कुरुलकर म्हणाला, “माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक डिझाईन्स आहेत.’ त्यावर ती म्हणाली ‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३० वर लागेल ना? आपण आधीपण यावर चर्चा केलीय.’ त्याला डॉ. कुरुलकर याने हो, असे उत्तर दिले असून, पुढे त्याने ‘आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत,’ अशी माहिती दिली.

माझा नंबर ब्लॉक का केला? झाराचा सवाल

डॉ. कुरुलकरला झारा हिने ती युकेमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची ओळख सांगितली होती. त्यानंतर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये डॉ. कुरुलकर याने झाराचा मोबाईल ब्लॉक केला होता. तिने अनोळखी क्रमांकावरून माझा मोबाईल ब्लॉक का केला, असा प्रश्न डॉ. कुरुलकर याला विचारला, असे आरोपपत्रात नमूद आहे.

डॉ. कुरुलकरने चॅटिंगद्वारे झाराला काय माहिती दिली :

- एसएएमची टेस्ट झाली व ती हवार्इ व सैन्य दलाला देणार

- ड्रोनद्वारे घेण्यात आलेले फोटो पाठवले

- ड्रोनच्या टेस्टींगचे व्हीडीओ पाठवले

- कोणत्या देशांनी एके सिस्टम मागवली

- फिलीपीनने ब्रह्मोसच्या ऑर्डरमध्ये वाढ केली

- अग्नी - ६ मी डिझार्इन केले आहे

अग्नी ६ बाबत झालेले चॅटिंग

झारा : अग्नी ६ चे काम कसे सुरू आहे, त्याची टेस्ट कधी होणार?

डॉ. कुरुलकर : नार्इट फायर करणार, थोडा धीर धर

झारा : अग्नी ६ कुठे जाणार सैन्य की हवार्इदल?

डॉ. कुरुलकर : दोन्हीकडे

झारा दासगुप्ता आणि डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यातील चॅटिंग :

झारा : ब्रह्मोससाठी किती व्हर्जन मॉडिफाईड केली गेली?

डॉ. कुरुलकर : मला वाटते खूप आहे. बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील.

झारा : बेब, डिझाईन रिपोर्ट म्हणजे तुझ्या मते कसा असेल?

डॉ. कुरुलकर : बेब, याची तुला कॉपी व्हॉटस्अप किंवा मेल करू शकत नाही. हे खूप संवेदनशील आहे. मी ती मिळवितो आणि तयार ठेवतो. तू इथे आल्यावर ती दाखवतो’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather : पुण्यात थंडीला सुरुवात; पाच दिवसांत पारा येणार आणखी खाली

Wardha Crime: प्रेमसंबंधास नकार, तरुणीचा आवळला गळा तरुणीचा अन्...

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Nagpur Crime: कौटुंबिक वादातून पुतण्याकडून काकाचा खून; पारडीतील घटना, चाकूने वार करीत संपविले

SCROLL FOR NEXT