पुणे

सातारा पूर्वमोसमी पावसाचा फटका

CD

पूर्वमोसमी पावसाचा
साताऱ्याला मोठा फटका

वीज पडून २० शेळ्या आणि गाईचा मृत्यू; घरांचे नुकसान

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी (ता. १३) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले असून, वेगवेगळ्या तालुक्यांत या पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. सातारा शहराजवळील कोंडवे येथे वीज पडून २० शेळ्यांचा, तर खटाव तालुक्यातील पेडगाव येथे एका गाईचा मृत्यू झाला आहे; तसेच माण तालुक्यातील उकिर्डे येथे चक्रीवादळामुळे अनेक घरांची छपरे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
सातारा शहरात आज मुसळधार पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली; मात्र वादळी वाऱ्यामुळे शहरातील विविध भागांत झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाले. तालुक्यातील शेंद्रे, अतित, काशीळ परिसरास झोडपून काढले आहे. सातारा जवळील कोंडवे परिसरात अचानक वीज कोसळल्याने २० शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. अशीच दुर्दैवी घटना खटाव तालुक्यातील पेडगाव येथे घडली असून, तिथेही वीज पडून एका गाईचा मृत्यू झाला आहे. माण तालुक्यातील उकिर्डे आणि दहिवडी परिसराला या वादळाचा तीव्र तडाखा बसला. उकिर्डे येथे दुपारी दोनच्या सुमारास आलेल्या प्रचंड वेगाच्या चक्रीवादळाने घनानंद कांबळे, मानसिंग साळुंखे, लक्ष्मण इंदलकर, नाथा कांबळे आणि उत्तम कांबळे यांच्या घरांवरील संपूर्ण पत्रे उडून शेजारच्या मोकळ्या जागेत जाऊन पडले. यामध्ये उत्तम कांबळे यांच्या घराचे नुकसान झाले असून, छत उडाल्याने घरातील धान्य, कपडे, घरगुती साहित्य पावसात पूर्णपणे भिजून नष्ट झाले आहे. तसेच, घनानंद कांबळे यांच्या घराशेजारील मोठे झाड उन्मळून पडल्याने तिथे बांधलेली काही जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. शासनाने तातडीने आर्थिक मदत व पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. फलटण शहर आणि दुधेबावी परिसरातही सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. ग्रामीण भागात सध्या कांदा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने, या अचानक आलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे काढलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली. पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात झालेल्या या मोठ्या नुकसानीची दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क केले आहे. पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची, तसेच प्राणी व मनुष्य हानीची प्राथमिक माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावी आणि बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT