Pune Rain News esakal
पुणे

Pune Rain : पुण्यात सलग तीन दिवस पूर्व मोसमी पावसाची हजेरी

पूर्व मोसमी पावसाने गुरुवारी (ता. १) शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी ही हजेरी लावली. मेघगर्जना, वादळी वारे अन् काही भागात गारांचा पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पूर्व मोसमी पावसाने गुरुवारी (ता. १) शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी ही हजेरी लावली. मेघगर्जना, वादळी वारे अन् काही भागात गारांचा पाऊस झाला. एकीकडे कामाला तापमानाचा पारा ४० अंशाच्या घरात असल्याने दिवसा उन्हाचा ताप आणि दुपारनंतर पडणारा पाऊस अशी स्थिती सध्या पुण्यात आहे. तर शुक्रवारी (ता. १) पुणे व परिसरात दिवसा उष्ण वातावरण राहणार असून दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण होत पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरासह उपनगरांमध्ये पावसाची नोंद होत असून काही भागात तर वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळपासून उन्हाचा झळा कायम होत्या. मात्र दुपारनंतर पुण्याच्या पश्चिम भागात ढग निर्माण होऊ लागले. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचे वरे, विजांचा कडकडाटात शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या जोरदार सरी पडल्या. सांगवी, बाणेर या भागात गारांसह जोरदार पाऊस पडला. शिवाजीनगर, खडकवासला, वडगाव शेरी, खराडी, विमान नगर, औंध, पाषाण, सुतारवाडीसह विविध ठिकाणी वाऱ्यासह माध्यम ते जोरदार पाऊस पडला.

शहरात गुरुवारी ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर सायंकाळी ०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सरासी पेक्षा तापमानात ४ अंशांनी वाढ झाली होती. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशाच्या दरम्यान होता.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पुढील आठवडाभर कमाल तापमानाचा पारा हा ४० अंशाच्या दरम्यान असेल. त्यामुळे उन्हाच्या झळा अशाच कायम राहणार आहेत. तर पुणे आणि परिसरात येत्या दोन ते तीन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT