Pune road condition sakal
पुणे

Pune Road Condition :राष्ट्रपती कार्यालयाने टोचले महापालिकेचे कान; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीच्या सूचना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर आलेल्या असताना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्यांना सामना करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौऱ्यावर आलेल्या असताना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्यांना सामना करावा लागला. त्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवा, असे पत्र वाहतूक पोलिस उपायुक्त जी. श्रीधर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाठवले आहे.

दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे महापालिकेपुढे आव्हान असे वृत्त ‘सकाळ’ने ३० ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. शहरात महापालिकेच्या कामांसह खासगी कंपन्यांच्या केबलसाठी खोदकाम करण्यात आले होते.

त्यावर डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले. पण जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडून चाळण झाली. महापालिकेने खड्डे बुजविले असा दावा केला तरी पुन्हा नव्याने खड्डे पडले.

गणेशखिंड रस्त्यावर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गातील खड्डे कोणी दुरुस्त करायचे, यावरून पीएमआरडीए आणि पुणे महापालिका यांच्यात हद्दीचा वाद आहे.

दरम्यान, राष्ट्रपती मुर्मू या पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांचा मुक्काम राजभवनात होता. त्यांचा ताफा गणेशखिंड रस्त्यावरून गेला. त्या वेळी त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला. राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहून ही नाराजी कळवली आहे. तसेच २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रवास मार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत, अशा सूचना महापालिकेला दिल्या आहेत.

असा असेल पंतप्रधानांचा दौरा

पंतप्रधान मोदी लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर मोटारीने शिवाजीनगर न्यायालय मेट्रो स्टेशन येथे जाणार आहेत, तसेच स्वारगेट मेट्रो स्टेशनवरून ते स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी उपस्थित राहतील. तेथून ते परत विमानतळावर जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज (ता. २१) या संपूर्ण मार्गावरील रस्त्याची पाहणी केली. दुरुस्तीच्या ठिकाणांची नोंद करून घेतली आहे. २६ सप्टेंबरपूर्वी येथे दुरुस्ती केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्याची आज पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. या मार्गाची दुरुस्ती करणे, खड्डे बुजविणे, गतिरोधक काढून टाकण्यात येणार आहेत. ही कामे २६ सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली जातील, तसेच गणेशखिंड रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात येतील.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT