पुणे

Coronavirus : पुण्यात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रोज अडीच हजार नवे रुग्ण सापडू शकतात, असा अंदाज बांधून एवढ्या रुग्णांसाठीच्या मोफत उपचाराची व्यवस्था महापालिकेने केली आहे. डॉ. नायडू रुग्णालयासह कोविड हॉस्पिटल, दोन जम्बोत पुरेसे अतिदक्षता विभाग आणि ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. त्याचवेळी कोरोना चाचण्याही सहा हजारांपर्यंत नेण्याची सोय केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे, महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिग्रहण केलेल्या ९४ खासगी हॉस्पिटलमध्ये सुमारे १९ हजार ४४२ बेड आहेत. त्यातून ४ हजार ८४ रुग्णांना ऑक्‍सिजन पुरविता येणार असून, साडेसातशे व्हेंटिलेटर आहेत. त्याशिवाय, गरजेनुसार खासगी हॉस्पिटल पुन्हा ताब्यात घेण्यात येतील, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

शहरात आटोक्‍यात येत असलेली कोरोनाची साथ डिसेंबर-जानेवारीत वाढण्याची भीती आहेत. त्यात दसरा आणि आता दिवाळीत सर्वत्र गर्दी झाल्याने या टप्प्यात रुग्ण वाढणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आरोग्य यंत्रणेचा विस्तार करीत रुग्णांना वेळीच योग्य उपचार देण्याचे नियोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधीच्या टप्प्यात एका दिवसात सर्वाधिक २ हजार ५०० रुग्ण सापडले होते. नव्या टप्प्यात हाच आकडा राहण्याची शक्‍यता आहे. तर, एका दिवसात सर्वाधिक १७ हजार ५०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची नोंद आहे. त्यातही वाढ होऊन एका दिवसात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २० ते २१ हजारांपर्यंत जाईल; त्या प्रमाणात सध्या बेड आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले.

कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या वाढविणार
पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचारी व प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता भासली होती. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांत अडचणी आल्या. मात्र, जम्बोसह महापालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालयांत पुरेसे अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करण्यावर भर राहणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नव्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून गरजेनुसार त्यांना विलग केले जाईल. अत्यवस्थ रुग्णांना पहिल्या टप्प्यात गरजेनुसार नेमके उपचार (इंजेक्‍शन) केले जातील. या उपायांमुळे कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि मृत्युदर कमी करता येणार आहे. तशी व्यवस्था केली आहे.
- रुबल अग्रवाल,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

1800 ते 2200 - सध्याच्या तपासण्या
200 ते 250 - रोजचे रुग्ण
358 - अत्यवस्थ रुग्ण 
4 हजार 290 - एकूण रुग्ण
हॉस्पिटलमध्ये : 1500 घरात : 2790 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच मोठी बंडखोरी, भाजपच्या तीन नेत्यांचे अर्ज; रवी राणांचाही पक्ष रिंगणात

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Marathi News Live Updates:जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पडळकर, विशाल पाटील आणि सत्यजित देशमुखांना दिलासा; अर्ज वैध, काही अर्ज अवैध ठरल्याने राजकीय घडामोडींना वेग

एका ओव्हरमध्ये ६ षटकार ठोकायचेत! वैभव सूर्यवंशीने सांगितली भविष्यातील ६ मोठ्या स्वप्नांची यादी; नंबर-१ पाहून चाहतेही चक्रावले

SCROLL FOR NEXT