पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशाचे धनी : डॉ. भालचंद्र मुणगेकर

डॉ. संदेश शहा

इंदापूर : भ्रष्टाचार, बनावट नोटा तसेच अतिरेकी कारवाया बंद होण्यासाठी शासनाने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय बेजबाबदार ठरल्याने देश इतिहासात अरूण जेटली हे सर्वाधिक अपयशी अर्थमंत्री तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपयशाचे धनी आहेत, असा हल्लाबोल माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला. 

माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत 'भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री तथा संस्था अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. यावेळी करणसिंह घोलप,पद्माताई भोसले, अॅड. कृष्णाजी यादव, मयुरसिंह पाटील, बाळासाहेब खटके, तुकाराम जाधव, लालासाहेब पवार, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. महाविद्यालय माय नियतकालिक तसेच अर्थबोधचे प्रकाशन यावेळी झाले.

डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी जीएसटीस विरोध केला. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी हे विधेयक मंजूर केले. प्रादेशिक असमतोल, स्त्रीयांना दुय्यम वागणूक, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, नोटाबंदी व जीएसटी याचा विपरित परिणाम विकासदरावर होत आहे. त्यामुळे प्रभावी अर्थसत्ता होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजघटनेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. माजी खासदार कै. पाटील यांनी सहकार केंद्रबिंदू मानून शेतक-यांचे आर्थिक परिवर्तन केले. त्यामुळे सरकारने बेरोजगारांना काम 
देण्यासाठी सहकार, शेतीपुरक उद्योगास सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. 

माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, युवापिढीने आपल्यातील सामर्थ्य ओळखून तेजस्विता, तपस्विता तसेच तत्परता तत्व केंद्रबिंदू मानून स्वत:स सिध्द केले पाहिजे. 

स्वागत प्राचार्य डॉ. संजय चाकणे तर प्रास्ताविक सचिव मुकूंद शहा यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महादेव वाळूंज व बाळासाहेब पराडे तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य नागनाथ ढवळे यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT