पुणे

प्रवेश शुल्कावरून मुख्याध्यापिकेला उचलून टाकण्याची पालकांची धमकी

CD

प्रवेश शुल्कावरून मुख्याध्यापिकेला
धमकी; पाच जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २७ : शाळेतील मुख्याध्यापिकेच्या कक्षात घुसून प्रवेश शुल्काची रक्कम मागत अरेरावी व धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा केचगुंडी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, १६ जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

फिर्यादीनुसार, श्रीमत सरस्वती बालक मंदिर शाळेतील मुख्याध्यापिका निशा केचगुंडी या त्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना सिद्राम तट्टे, मोहन मादगुंडी, नरसिंह आदप्पा सरला व अन्य दोन अनोळखी व्यक्ती मुख्याध्यापिकेच्या कक्षात आले. त्यांनी प्रवेश शुल्काची जमा झालेली रक्कम देण्याची मागणी केली. त्यावर केचगुंडी यांनी पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले.

यामुळे संबंधितांनी त्यांना घेराव घालत शरीरास स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तसेच अरेरावी करत, ‘बघून घेतो’, ‘तुमच्यासारखे दहा मुख्याध्यापक येथे आणून बसवू’, ‘आत्ताच्या आत्ता पैसे द्या, अन्यथा तुमची उचलबांगडी करू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेदरम्यान ‘डायल ११२’वरून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस तातडीने शाळेत दाखल झाले. संबंधितांना नोटीस बजावून पुढील चौकशी करण्यात येणार असून, सहायक पोलिस निरीक्षक राजगुरू तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT