Yerwada Jail 
पुणे

पुणे : येरवडा कारागृहातून एका कैद्याचे पलायन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा कारागृहाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदुन शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शनिवारी पलायन केले. ही घटना शनिवारी दुपारी साडे चार ते रात्री साडे आठ या वेळेत येरवडा खुले कारागृहामध्ये घडली.

संजय रामजीत भुईया (वय 36, रा.सिधारी, झारखंड) असे पलायन करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा करागृह प्रशासनाचे अधिकारी हेमंत पाटील (वय 42, रा.चंदननगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुईया हा एका गुन्हामध्ये उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये येरवडा कारागृहामध्ये दाखल झाला होता.

दरम्यान, सायंकाळी पावणे सहा वाजता सर्व कैद्याची गणती केली जात होती. त्यावेळी भूईया हा तेथे आढळला नाही. इतर कैद्याकडे चौकशी केल्यानंतर तो दुपारी साडे चार वाजल्यापासून दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खुले कारागृह, शेती परीसर, संपूर्ण तट, जंगल परीसर व आजुबाजूच्या वस्तीमध्ये शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. कैदी कारागृहात नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : पुण्यात कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Delhi Protest ला Manoj Jarange Patil यांचा पाठिंबा, काय म्हणाले? | Abhijeet Dipke | CJP

SCROLL FOR NEXT