पुणे - पृथ्वीराज इंगळे याचा गौरव करताना राजकुमार सुंठवाल, मोहन कुलकर्णी, दत्तात्रेय थिटे, सतीश इंगळे, दया इंगळे, श्रीकांत पारगावकर आदी.
पुणे - पृथ्वीराज इंगळे याचा गौरव करताना राजकुमार सुंठवाल, मोहन कुलकर्णी, दत्तात्रेय थिटे, सतीश इंगळे, दया इंगळे, श्रीकांत पारगावकर आदी. 
पुणे

दिव्यांग पृथ्वीराजचा गायनात विश्‍वविक्रम

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दिव्यांग असूनही चौदावर्षीय पृथ्वीराज इंगळे याने सलग पाच तास शास्त्रीय, भावगीत आणि चित्रपट गीतांचे गायन करून विश्‍वविक्रम केला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात इतिहास रचला आणि पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला. 

महापौर राहुल जाधव, पंडित उपेंद्र भट, भावगीत गायक श्रीकांत पारगावकर, वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर, अनिरुद्ध हळदे, संतोष राऊत, पृथ्वीराजच्या गुरू हिराताई दराडे, वडील सतीश इंगळे, दया इंगळे, मोहन कुलकर्णी, दत्ता थिटे, गफ्फार मोमीन, राजकुमार सुंठवाल आदींच्या उपस्थितीत पृथ्वीराजने विश्‍वविक्रम केला. त्याने राग सारंग व मारुबिहाग; ‘प्रथम तुला वंदितो’, ‘विठ्ठला तु वेडा कुंभार’, अशा भक्ती रचना, ‘आ चल के तुझे’, ‘फुलोंका तारोंका सबका कहेना है’ आदी चित्रपटगीते सादर केली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. 

महापौर जाधव म्हणाले, ‘‘पृथ्वीराज दिव्यांग असूनही त्याचे आई-वडील खचले नाहीत. परिश्रम घेऊन पृथ्वीराजला घडवले आहे. ’’ पारगावकर म्हणाले, ‘‘पृथ्वीराजची गाण्याची शैली, वैविध्य पाहून प्रभावित झालो आहे. त्याचे सादरीकरण इतर कलावंतांना प्रोत्साहन देणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT