Adharkard
Adharkard 
पुणे

आधार कार्डसाठी कोण देणार "आधार'?

मिलिंद संघई

बारामती (पुणे) : "आई भीक मागू देईना आणि बाप जेवू घालेना' या म्हणीप्रमाणे आधार कार्डाबाबत सध्या बारामतीकरांची अवस्था झाली आहे. एकीकडे आधार कार्डशिवाय कोणतेच सरकारी काम होत नाही आणि दुसरीकडे आधार कार्ड काढण्यासाठी सुविधाच नाही, अशी विचित्र स्थिती झाली आहे.
 
बारामतीत बॅंक ऑफ बडोदा, आयडीबीआय बॅंक व पोस्ट कार्यालय अशा तीन, तर तालुक्‍यात पणदरे, तांदूळवाडी, करंजेपूल, निंबूत, सांगवी व लोणीभापकर या ठिकाणी आधार कार्ड काढणे किंवा दुरुस्तीची सुविधा उपलब्ध आहे असे सांगितले गेले. मात्र तालुक्‍यात अनेक ठिकाणी ही सुविधाच उपलब्ध नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तालुक्‍यात 99 ग्रामपंचायती असताना आधारची सुविधा फक्त सहाच ठिकाणी आहे.

या संदर्भात संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार बॅंक ऑफ बडोदामध्ये गेल्या तीस दिवसांत 37, आयडीबीआय बॅंकेत शून्य, तर पोस्टात 35 अर्जांवर काम झालेले आहे. बॅंकांतून आधार कार्डबाबत अनास्थाच दाखविली जाते, पोस्टाची तर यावर कडी आहे. महा ई-सेवा केंद्रचालक आधार कार्डशी संबंधित काम करण्यास तयार असताना त्यांना जाणीवपूर्वक हे काम दिले जात नसल्याच्या केंद्र चालकांच्या तक्रारी आहेत.

पोस्ट कार्यालयात आधार कार्डचे काम घेऊन गेल्यानंतर थेट दोन किंवा तीन महिन्यानंतरच या, त्यासाठी नावनोंदणी करा, असे उत्तर दिले जाते. पोस्टात आधार कार्डसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने दुपारी चारनंतर त्यांचे कामकाज सुरू होते, मात्र या सर्वांत सामान्य माणूस वेठीला धरला जात आहे. तीन लाखांहून अधिक लोकसंख्येचा तालुका असलेल्या बारामतीत आधार कार्डसाठी लोकांना अक्षरशः वणवण करावी लागते, मात्र त्याकडे लक्ष देण्याची कोणाची तयारीच नाही.

कोणत्याही बॅंकेत खाते उघडण्यापासून ते पासपोर्टपर्यंत आणि प्रवेशापासून अनुदान प्राप्त करण्यापर्यंत सगळीकडेच आधार कार्ड सक्तीचेच आहे. त्यामुळे आधार कार्ड नव्याने काढणे किंवा त्यात दुरुस्ती करण्यासाठी बारामती तालुक्‍यात मोठ्या संख्येने केंद्र असण्याची आवश्‍यकता आहे, प्रत्यक्षात या बाबत कार्यवाही होत नाही.

या कामाची जबाबदारी महाऑनलाइनकडे असते. त्यांच्याकडेच आधार कार्डबाबतचा विषय आहे. याबाबत बारामती शहराची निकड त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम करू.
- विजय पाटील, तहसीलदार, बारामती

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT