problem of Water scarcity in old sangvi area 
पुणे

जुनी सांगवीत बाहेर पावसाच्या सरी, पाण्याचा टँकर दारी; नागरिकांचे हाल

रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात दुरूस्त्या दिवसा आड होणारा पाणीपुरवठा, कुठे कमी अधिक दाबाने येणारे पाणी दुरूस्त्या, देखभालीसाठी केले जाणारे पाणी बंद यामुळे जुनी सांगवी परिसरात नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पवना धरण शंभर टक्के भरले असून याचबरोबर सध्या होत असलेला पाऊस पाहता तरीही पाणी टंचाई का अशा भावना नागरीकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. यातच सुरू असलेली रस्त्यांची कामे खोदकाम करताना तुटलेल्या पाईपलाईनमुळे गतआठवड्यात येथील शितोळेनगर, मधुबन परिसराचा पाणीपुरवठ्याचे नियोजन हुकल्याने खोळंबा होवून पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता.

लोणावळेकर अडकले दुहेरी कात्रीत; एकीकडे रोजीरोटीचा प्रश्न तर दुसरीकडे...

बुधवार (ता.९) रात्री वरून पावसाच्या सरी कोसळत असतानाही येथील मुळा नगर भागात टँकरद्वारे पाणी साठवणूक करण्याची नागरिकांची धांदल पाहायला मिळाली. याच बरोबर अभिनव मुळा नदी किनारा रस्ता परिसरातील तेरा कुटुंबांना गेली तिन चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे समस्या सोडवावी यासाठी लेखी विनंती अर्ज देखील वेळोवेळी केलेला आहे. अर्जात त्यांनी म्हटले आहे की तक्रारीनंतर आम्ही गेली तीन-चार महिन्यांपासून अपुरा व कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहोत. आम्ही वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे विनंती अर्ज केलेले आहेत. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दखल घेतात येतात दुरुस्त्या करतात. मात्र प्रश्‍न आहे तसाच आहे. अर्जावर येथील रहिवासी संजय गायकवाड, भानुदास सोनवणे सुमित्रा गायकवाड, चंद्रकांत गायकवाड दिलीप अवघडे, कमलेश साठे आदींच्या सह्या आहेत.

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?
 

''गेली तीन चार महिन्यांपासून पाणी कमी येते.''
- संजय गायकवाड, नागरीक

''येथे वेळोवेळी दुरूस्त्या केल्या गेल्या मात्र तरीही पाणी कमी दाबाने येत असल्याने गेली तीन चार महिन्यांपासून पाणी टंचाईचा त्रास होत आहे.''
- सुमित्रा गायकवाड 

''कमी पाणी मिळत असल्याने अनेकदा पिण्यासाठी व वापरासाठी ईतर ठिकाणांहून पाणी आणावे लागते.''
- दिलिप अवघडे, नागरीक 

''मी अनेकवेळा विकत पाणी घेतले आहे.यामुळे एकतर संकटकाळात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.''
-भानुदास सोनवणे,नागरीक 

''यापुर्वी अनेकवेळा येथील दुरूस्त्या केलेल्या आहेत.येथील नेमकी अडचण शोधून उपाययोजना करण्यात येईल.''
- एल.ए.वायाळ- अभियंता पाणीपुरवठा विभाग जुनी सांगवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT