पुणे

संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख

सकाळवृत्तसेवा

पुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार आल्याने अन्य साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार नाही. यामुळे ही प्रक्रिया चुकीची आहे. त्यापेक्षा दरवर्षी पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची समिती नेमावी. तिच्या सदस्यांची नावे गुपित ठेवून त्यांनी एका साहित्यिकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करावी, असा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्य महामंडळाला पाठविला आहे. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत टीका केली. ते म्हणाले, ‘‘निवडणूक बंद करून सन्मानाने संमेलनाध्यक्षाची निवड करण्याची भूमिका महामंडळाने घेतली. मात्र यामुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. यवतमाळ येथे २८ ऑक्‍टोबरला नव्या संमेलनाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यापूर्वी महामंडळांचे सदस्य माझ्या प्रस्तावाचा विचार करून घटना दुरुस्ती करू शकतात.’’ 

घटक संस्थांकडून आलेल्या नावांपैकी एका नावावर महामंडळाच्या बैठकीत एकमत होणे अशक्‍य आहे. त्यातच एका साहित्यिकाचे नाव निश्‍चित झाल्यावर उर्वरित साहित्यिक पुन्हा आपले नाव सुचविण्यास नकार देतील. त्यापेक्षा पाच सदस्यांनी केलेली निवड ही वाड्‌.मयीन निकष लावून केलेली असावी, अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली.

लैंगिक शोषण होते, हे सांगायलाही धारिष्ट्य लागते. परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर आणि लेखक चेतन भगत यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. ‘मी टू’ चळवळीद्वारे महिला उघडपणे बोलू लागल्या आहेत. अकबर यांनी मंत्रिपदावर राहणेच मला मान्य नाही. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही; तोपर्यंत मोदी सरकार स्त्रीपूजक नाही, असेच मी म्हणेन, हे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT