Home
Home 
पुणे

#PropertyCard आता बना कायदेशीर मालक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात आता सर्व्हे नंबरनुसार एकच प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यातील फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा पुरावा प्रत्येकाला मिळणार आहे.

अगोदरची पद्धत
शहरात १९७० ते १९७५ या काळात प्रत्येक सर्व्हे नंबरला एक प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. त्या सर्व्हे नंबरमधील घरे अथवा सोसायट्या आणि क्षेत्राचा समावेश त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड एकच असायचे.

आता अशी असेल पद्धत
एकाच प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक घोळ आणि न्यायालयीन दावे निर्माण झाले. हे ओळखून भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सोसायटीला आणि सोसायटीतील सदनिकाधारकाला पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक घरे, बंगला अथवा रो-हाउस असलेल्यांनाही हे कार्ड देण्यात येणार आहे. 

कार्डची संख्या मर्यादितच
चाळीस ते पंचेचाळीस वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली. जुन्या सोसासट्यांचा पुनर्विकास झाला. हा करताना मोठ्या प्रमाणावर मंजूर ले-आउटमध्ये बदल करण्यात आले. परंतु, सर्व्हे नंबरचे एकच प्रॉपर्टी कार्ड असल्याने त्यामध्ये बदल झाला नाही. परिणामी, प्रॉपर्टी कार्ड सर्व्हे नंबरनुसार असल्याने शहरात प्रॉपर्टी कार्डची संख्या फक्त ९० हजार एवढीच राहिली.

प्रत्येक जागामालक, सोसायटी, फ्लॅटधारकाला प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सोसायट्यांनी पुढाकार घेऊन नगर भूमापन कार्यालयात आवश्‍यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा.
- संजय कुंभार, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT