crime esakal
पुणे

Crime News : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलीसांचा छापा, एकाला अटक

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले.

निलेश बोरुडे

किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले असून, हवेली पोलीसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून एकाला अटक केली आहे. शैलेश सर्जेराव देडे (वय 33, रा. फ्लॅट नं 204, महालक्ष्मी सोसायटी, कोल्हेवाडी, सिंहगड रोड, पुणे-24) असे अटक करण्यात आलेल्या मसाज सेंटर चालकाचे नाव आहे.

नांदेड फाट्याजवळील स्पर्श मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात आहे का याची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक व सोबत एका पंचाला पाठविण्यात आले. यावेळी प्रभारी अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी नांदेड फाट्याजवळ थांबून होते.

बनावट ग्राहक व पंचांनी मसाज सेंटरमध्ये अतिरिक्त पैसे घेऊन वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पथकाला ठरल्याप्रमाणे मिस कॉल देऊन कळविल्यानंतर छापा टाकण्यात आला. पोलीसांनी मसाज सेंटरची तपासणी केली असता संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

तसेच तेथे आढळून आलेल्या महिलेनेही मसाज सेंटर चालक अतिरिक्त पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याची कबुली दिली. त्यानुसार मसाज सेंटर चालक शैलेश सर्जेराव देडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT