sangvi
sangvi 
पुणे

जुनी सांगवीत राष्ट्रवादीच्या महिलांकडून राम कदमांचा निषेध

रमेश मोरे

जुनी सांगवी - बेताल व्यक्तव्याने महिलांच्या भावना दुखावुन सामाजिक तेढ निर्माण करणा-या भाजपच्या राम कदम यांचा जुनी सांगवीत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने महिलांनी जाहिर निषेध केला.

जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शितोळे मार्केट ते अहिल्यादेवी होळकर स्मारक चौकात राम कदम यांच्या प्रतिमेला महिलांनी काळे फासुन जोडो मारो आंदोलन करण्यात आले. 

यावेळी राम कदम हाय हाय, भाजपा सरकार घरी पाठवाअशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जगताप, प्रशांत शितोळे, मनोहर पवार, पंकज कांबळे, शिवाजी पाडुळे यांनी भाजपा सरकार मधील मंत्री पदाधिका-यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. 

प्रशांत शितोळे म्हणाले, भाजपात आयात केलेली ही नालायक मंडळी समाजिक वातावरण विस्कळित करण्याचा प्रयत्न करत आहेत. लग्नाच्या वयात असलेल्या मुलींबद्दल असे वक्तव्य करणा-यांवर कठोर शासन झाले पाहिजे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यासारख्या आदर्श विरमातांच्या महाराष्ट्रात अशी वक्तव्य खपवुन घेतली जाणार नाहीत. यावेळी शितल शितोळे, राजश्री पोटे, जयश्री वगनवार, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, आदीं महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT