gajendrasinh-shekhawat
gajendrasinh-shekhawat 
पुणे

प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देणार - गजेंद्रसिंग शेखावत

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा संकल्प केला आहे, तो पूर्णत्वास नेऊन जगासमोर एक आदर्श उदाहरण घालून देऊ. शाश्‍वत पाणी व्यवस्थापनासाठी दोन वर्षांत चांगले जलस्रोत शोधण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासोबतच पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले.

जलशक्ती मंत्रालय आणि जलसंपदा विभागाच्या वतीने ‘शाश्वत पाणी व्यवस्थापन’ विषयावर बुधवार (ता. ६) पासून येथे तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेखावत म्हणाले, ‘‘जगाच्या तुलनेत १८ टक्‍के लोकसंख्या भारतात असून, त्या तुलनेत केवळ चार टक्‍के पाणी उपलब्ध आहे. तसेच, देशातील १८ टक्‍के क्षेत्रात पूरस्थिती, तर १३ टक्‍के भागात दुष्काळी स्थिती आहे. दिवाळीच्या दिवसांतही नोव्हेंबर महिन्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, हे हवामान बदलाचे परिणाम असून, देशासमोरील परिस्थिती आव्हानात्मक होत चालली आहे.’’ 

देशातील २२ टक्‍के जलस्रोत प्रदूषित झाले आहेत, त्यामुळे देशातील जलस्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण करून ही बाब जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यात येईल. राजकीय, भौगोलिक आणि जागतिक सीमाभिंती ओलांडून शाश्‍वत पाणी व्यवस्थापनाबाबत सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान, जलशक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पाण्याचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होऊ शकते. हिवरे बाजार त्याचे आदर्श उदाहरण आहे.’’ प्रधान सचिव आय. एस. चहाल यांनी प्रास्ताविक केले. खलील अन्सारी यांनी आभार मानले. खासदार वंदना चव्हाण, ऑस्ट्रेलियाच्या मुंबई दूतावासातील प्रतिनिधी टोनी हुबेर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, सचिव राजेंद्र पवार, वरिष्ठ सहआयुक्त राकेश कश्‍यप, अखिल कुमार, महासंचालक एन. व्ही. शिंदे, मुख्य अभियंता व्ही. जी. रजपूत, राजेंद्र मोहिते, एस. डी. भगत आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT