vegetables 
पुणे

Coronavirus: मंचरमधील कष्टकऱ्यांना दिलासा; वस्तीतील कुटुंबांना भाजी, किराणा वाटप 

सकाळवृत्तसेवा

मंचर - येथील इंदिरानगर वस्तीतील ४१ कष्टकरी कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा भाजीपाला व किराणामाल दिला. त्यामुळे कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

इंदिरानगरमधील ४१ कष्टकरी कुटुंबांचा दिवसभर काम केल्यानंतर मिळणाऱ्या पैशातूनच संसाराचा गाडा चालत होता. पण, गेली दहा दिवस संचारबंदीमुळे रोजगारही बुडाला. घरात शिल्लक असलेले अन्नधान्य संपून गेले. उपासमारीचा प्रसंग सुरू झाला. ही माहिती समजल्यानंतर उद्योजक अजय घुले, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, गार्गी वळसे पाटील, वसंतराव बाणखेले, मंगेश बाणखेले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः तसेच ॲड सुशील अस्वारे, दिलीप जैन, प्रितेश गांधी, डेव्हिड उपार, प्रितम शहा, सुनील थोरात, धनेश धुमाळ, डॉ. मोहन साळी, सोमनाथ अरगडे, सत्यवान ढेरे, प्रशांत घुले, शिवनेरी मिसळचे मॅनेजर अक्षय डुबे यांनी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. दूध, साखर, चहा पावडर, तेल, डाळ, मिरची पावडर, तांदूळ, गहू, मीठ, बटाटा, कांदा, लसूण, आले, टोमॅटो, साबण, फरसाण आदी साहित्यचे वाटप केले. दहा दिवस पुरेल एवढा किराणामाल मिळाल्यामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. 

तसेच, कंपनी बंद झाल्याने मंचरहून पायी निगडी येथे तीन मुली जात होत्या, त्यांना मंचर पोलिसांनी त्यांच्या खोलीवर सोडले. तसेच, सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड यांच्या हस्ते त्यांना किराणा माल देण्यात आला. 

दरम्यान, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे ग्रामस्थांच्यावतीने गावातील ५० गरजू कुटुंबांना भाजीपाला व तरकारी मालाचे वाटप गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT