PSI sarika ichake jadhav sakal
पुणे

PSI Exam Result : सासर, माहेरचे नाव केले उज्ज्वल! शेतकऱ्याच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

चांगुणा व बाळासाहेब जाधव या शेतकरी दाम्पत्याची कन्या सारिका इचके-जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी.

सकाळ वृत्तसेवा

पाबळ - आमदाबाद (ता. शिरूर) येथील चांगुणा व बाळासाहेब जाधव या शेतकरी दाम्पत्याची कन्या सारिका इचके-जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

सारिका हिने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदाबाद व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे पूर्ण केले आणि पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियंत्याची पदवी प्राप्त केली. अथक परिश्रम करण्याची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवल्यास ग्रामीण भागातील तरुण तरुणींना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवणे अशक्य नाही, हे तिने सिद्ध केले आहे.

चांगुणा व बाळासाहेब जाधव यांना आपल्या कन्येने उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, असे मनोमन वाटत होते. शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य परिस्थिती असूनही कोणतीही कसर न ठेवता त्यांनी कन्येला उच्चशिक्षित केले. आपल्या आईवडिलांचे काबाडकष्ट सारिका हिने पाहिले होते. त्यामुळे आपण वरिष्ठ अधिकारी बनायचे, ही खूणगाठ तिने मनाशी बांधली होती.

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कवठे येमाई येथील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शैला आणि प्रकाश इचके यांच्या कुटुंबात तिच्या रेशीमगाठी जुळल्या. सासरच्या मंडळींनीही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. लग्नानंतर तिने संसाराची जबाबदारी पार पाडत जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली आणि जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत, सासर व माहेर दोन्ही घराण्याचे नाव उज्ज्वल केले.

सारिका हिने मिळवलेल्या यशाबद्दल आमदाबाद आणि कवठे येमाई गावांबरोबरच तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आई-वडील, सासू-सासरे, पती यांनी दिलेल्या साथीमुळे व मित्र मैत्रिणी, गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे मी यश संपादन करू शकले. ग्रामीण भागातील मुले-मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना परिस्थितीचा बाऊ न करता जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर यश मिळवणे शक्य आहे.

- सारिका इचके-जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT