pune lockdown
pune lockdown  sakal
पुणे

बारामतीत जनजीवन पूर्वपदावर आणावे; व्यापा-यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

बारामती - शहर व तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा (Corona positivity) दर तीन टक्क्यांपर्यंत खाली आल्याने आता बारामतीचे निर्बंध (baramati covid situation) उठवावेत अशी मागणी व्यापारी करुन लागले आहेत.

1 ते 30 जुलै या तीस दिवसात बारामतीत तब्बल 35035 नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी झाली. या पैकी 1366 जण पॉझिटीव्ह आढळून आले. याची पॉझिटीव्हीटी अवघी तीन टक्के इतकी आहे. पूर्वी बारामतीत जो कम्युनिटी स्प्रेड झाला होता आणि पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या मोठी होती त्या पार्श्वभूमीवर आता बारामतीतील रुग्णांची संख्या नगण्य आहे.

एकीकडे रुग्णसंख्या घटत असून दुसरीकडे प्रशासनाने तपासण्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढवली असल्याने बारामतीने कोरोनावर मात केली असल्याचेच चित्र आहे. तीस दिवसांची आकडेवारी पॉझिटीव्हीटी तीन टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे दर्शवित आहे. त्या मुळे आता जनजीवन पूर्ववत करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. बारामतीत सरासरी दररोज 1100 तपासण्या होत आहेत. जुलै महिन्यात तीन दिवस दोन हजारांहून अधिक तपासण्या करण्याचा विक्रमही प्रशासनाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT