pune sakal
पुणे

Pune : उंडवडीत शिरसाईच्या पाण्यासाठी १०० शेतकर्यांचे चक्री उपोषण सुरु

या भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही.

विजय मोरे

उंडवडी - खडकवासला कालव्यातून बारामती तालुक्यातील शिर्सुफळ तलावात पाणी सोडून शिरसाई योजनेद्वारे लाभार्थी गावात आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी 14 गावातील तब्बल 100 शेतकरी आजपासून ( ता. 22 ) उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळावर चक्री उपोषणाला बसले आहेत. पहिल्यांदाच या भागात एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी उपोषणाला बसल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, कारखेल, खराडेवाडी, जराडवाडी, उंडवडी क. प, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, बर्हाणपूर, भोळोबावाडी, गोजुबावी आदी भागाला शिरसाई उपसा सिंचन योजना वरदान ठरत आहे. मात्र जलसंपदा विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे शिरसाई योजना कार्यांवित होवू शकली नाही.या भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. या भागातील विहीरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे.

यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वायाला गेला असून सद्यस्थितीला रब्बीसाठीही अपेक्षित पाऊस नसल्याने पेरण्याला सुरवात झालेली नाही. या भागात तीव्र चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरे कशी जगावयाची, असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला आहे.

या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाला अनेकदा करुनही पाटंधारे विभागाने तारीख पे तारीख सुरु ठेवले आहे. आत्तापर्यंत संबधित विभागाने आवर्तन सोडण्यासाठी तीन वेळा तारखा देवून शेतकर्यांची थट्टाच केली. त्यामुळे शेतकरी संतापले असून वेगवेगळ्या पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व लाभार्थी शेतकरी चक्री उपोषणाला बसले आहेत.

यावेळी शेतकरी सुनील वाबळे म्हणाले :-

"आमची पिढी एक पिढी गेली. आत्ता आमची पण पिढी जायला लागलीय. आत्ता आश्वासने नका देवू आत्ता फक्त शिरसाई योजनेचे पाणी क्षमतने द्या. ही आमची प्रमुख मागणी आहे."

शेत्करी जालिंदर वायसे - शिरसाईचे पाणी लाभार्थी गावांना मिळत नाही. त्यामुळे १४ गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. योजनेचे पाणी सोडल्याशिवाय शेतकरी माघार घेणार नाहीत. आत्ता पाणी गावात पोहचल्याशिवाय चक्री उपोषण बंद करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT