Corona-Death
Corona-Death 
पुणे

Big Breaking : पुण्यात कोरोनाने घेतले आतापर्यंतचे सर्वाधिक बळी, नव्या रुग्णांची संख्या...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना आठवडाभर दिलासा दिलेल्या कोरोनाने शुक्रवारी (ता.10) मात्र 12 रुग्णांचा जीव घेतला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 137 पर्यंत पोहोचली आहे. पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या जणांचा मृत्यू झाल्याने घबराट पसरली आहे.

दुसरीकडे, दिवसभरात कोरोनाचे नवे 99 रुग्ण सापडले आहेत. मात्र दिवसभरात 61 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, विविध रुग्णालयांतील 76 जणांची स्थिती गंभीर आहे. 

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यातच मृतांचे प्रमाणही आटोक्‍यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पुणेकरांत समाधान होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा रुग्ण संख्येत भर पडत आहे, तर मृतही वाढले आहे. गुरुवारी (ता.7) सात जणांचा बळी गेला आणि शुक्रवारी 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याआधी दिवसभरात सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या मृतांमध्ये महापालिकेच्या रुग्णांलयासह ससून आणि खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. सर्व मृतांना अन्यही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

शहरात आतापर्यंत सुमारे 20 हजार 270 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यौपकी 18 हजार 25 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 2 हजार 245 जणांना कोरोना झाला होता. त्यापैकी 732 जण बरे झाले आहेत. तर 137 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 1 हजार 377 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सध्या परदेशात पुण्यातील 80 प्रवासी अडकल्याची माहिती केंद्र सरकारने पुणे महापालिकेला दिली आहे. त्यानुसार या लोकांना आणण्याची तयाही महापालिकेने केली आहे. मात्र, त्यांना पुण्यात आणल्यानंतर 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचनाही सरकारने महापालिकेला केल्या आहेत. या लोकांना हॉटेलमध्ये विलग ठेवण्याचे नियोजन केल्याचे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT