pune a young man tooth broken in accident pothole on Baner road pmc  sakal
पुणे

Pune News : बाणेर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात तरुणाचा दात तुटला

बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असून तेथे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. जगदंब ज्युस बारच्या जवळच खड्डे पडल्याने त्यामध्ये महापालिकेने पेव्हिंग ब्लॉक टाकून हा खड्डा बुजवला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बाणेर रस्त्यावर खड्ड्यामुळे गाडी घसरून झालेल्या अपघातामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा दात तुटला, दोन्ही हाता, पायांना जबर मार लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. यामुळे खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचे आता तरी डोळे उघडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

गणेश पवार असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हे शुक्रवार पेठेमध्ये राहायला असून त्यांची बाणेर येथील हाय स्ट्रीट येथे कंपनी आहे. बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असून तेथे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. जगदंब ज्युस बारच्या जवळच खड्डे पडल्याने त्यामध्ये महापालिकेने पेव्हिंग ब्लॉक टाकून हा खड्डा बुजवला आहे.

मात्र हे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता एका लेवलमध्ये नाही, पेव्हिंग ब्लॉक हालत असून, काही ब्लॉक निघून गेल्याने खड्डा पडला आहे. गणेश हे सकाळी त्यांच्या दुचाकीवरून कंपनीत जात असताना या ठिकाणी दुचाकी घसरल्याने त्यांना जबर जखम झाली आहे.

गणेश यांचा दात तुटला तसेच नाकाला देखील मुक्कामार लागला आहे. दोन्ही हाताचे कोपरे, बोटांना जखमा झाल्या आहेत. दोन्ही गुडघे देखील फुटले आहेत. त्यांचा हा अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदत केली. या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झाले आहेत असे नागरिकांनी त्यांना सांगितले.

गणेश पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "इतकी वर्ष सत्तेत असूनही तुम्हाला नीट रस्ते बांधता येत नसतील तर राजकारणात असण्याची तुमची लायकी नाही. खुर्च्या खाली करा आणि चालते व्हा. थोडी फार जरी शिल्लक असेल तर सगळे काम ठेवा आणि खड्डे बुजवा." असा संताप सत्ताधाऱ्यांवर महापालिकेवर ट्विटमधून व्यक्त केला आहे.

'सकाळ'शी बोलताना गणेश पवार म्हणाले, शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबद्दल नागरिक वारंवार तक्रार करत आहेत. तरी देखील चांगले रस्ते केले जात नाहीत. हे खड्डे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. माझा दात तुटला, दुसरा दात हालत आहे. त्याची भरपाई महापालिका करून देणार नाही. पण किमान रस्ते तरी चांगले केले पाहिजेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT