Yavat
Yavat 
पुणे

त्या 9 मित्रांची दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कुठलेही रक्ताचे नाते नव्हते अथवा एकमेकाचे पैपाहुने अथवा भावभावकी नवह्ती.. तरीही लहाणपणीच मैत्रीची नाळ जळली.. जनु मैत्रीचे धागे नियतीने इतके घट्ट विनले गेले की, शेवटच्या क्षणापर्यंत हम सब साथ साथ म्हणण्यापर्यंत.. लहाणपणी न कळत एकमेकाना अंतर देणार नाही हे वचन घेणाऱ्या नऊ जणांना नियतीने एकाच वेळी अगदी लांबच्या प्रवासाला घेऊन गेली.

पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीत शुक्रवारी (ता. 19) मध्यरात्री बारा वाजुन पन्नास मिनिटाच्या सुमारास भरधाव ईट्रिगा गाडी ट्रक वर जाऊन आदळल्याने झालेल्या भिषण अपघातात ईट्रिका मधील अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी शुभम भिसे या नऊ जनांचा जागीच मृत्यु झाला.  शुभम भिसे वगळता उर्वरीत आठ जण वर्गमित्र होते. कांही वर्षापुर्वी यवत मधील विद्या विकास मंदीर शाळेपासुन आठ जण दुर गेले तरी, आठ जनांनी एकमेकापासुन ची नाळ थोडीसुध्दा तुटु दिली नव्हती. यात वर्गमित्र नसला तरी, शउभम भिसेही नववा भिडुप म्हणुन याच्याच कायम होता. लहानपासुन नियतीने बांधलेली मित्रत्वाची नाळ नियतीने अपघातानंतरही तुटु दिली नाही. जनु जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असा नारा देत नियतीने नऊही जणांना एकाचवेळी आपल्या बाहुपाशात घेतले. 

दरम्यान वरील अपघातात मृत्युमुखी पडलेले आठही जण यवतमधील विद्या विकास मंदीर शाळेत शिकायलाही एकत्रच होते. विशाल यादव, दत्ता यादव हे दोन जण मागिल कांही वर्षापासुन हडपसर मधील जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. निखिल वाबळे हा कदमवाकवस्ती येथील विश्वराज हॉस्पिटल बोऊन्सर
 म्हणुन काम करत होता. शुभम भिसे हा उरळी कांचन जवळील कासुर्डी गावातील महात्मा गांधी महाविद्यालयात बीसीएसचे शिक्षण घेत होता. तर अक्षय घिगे हा हडपसरमधील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होता. तर परवेज अशपाक आत्तार आझम कॅपसमधील पुणा कॉलेजमधे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर अक्षय वायकर हा भाजीपाला विक्री करुन शिक्षण घेत होता. तर नुर मोहम्मद दारा हा लोणी काळभोर एस. जी. के महाविद्यालयात बी ए च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. वरील नऊ जण वेगवेगळ्या शेत्रात असले तरी, रात्री घरी आल्यावर नऊही जण एकत्र येऊन आपआपली सुखदुःखे एकमेकात वाटपुन घेत होते. 

निखिल वाबळे वगळता, नऊ जणांपैकी आठ जणांनी गुरुवारी (ता. 18) सकाळी रायगड किल्ल्यावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. व आठही जण सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास इरटीका गाडीतुन लोणी स्टेशन येथे आले. त्यांनी आठ वाजण्याच्या सुमारास, विश्वराज हॉस्पिटलमधील आपला नववा मित्र, निखिल यास बोलावुन घेतले. निखिल आल्यावर नऊपैकी सात जणांना लोणीस्टेशन परीसरातील एका हॉटेलसमोर उभे राहुन सेल्फीही काढला व त्यानंतर नऊही जण रायगड परीसरात वर्षाविहारासाठी निघुन गेले. दोन दिवस मौजमजा करुन परतत असताना, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळाने अपघातरुपी घाला घालुन नऊही जनांना आपल्या कवेत घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT