Pune Accident News esakal
पुणे

Pune Accident News: पोर्शे अपघातानंतर पुन्हा पुणे हादरलंं! ट्रकने महाविद्यालयीन तरुणांना चिरडले, २ जणांचा मृत्यू, १ जखमी

Pune Accident News: पुण्यात पोर्शे अपघातानंतर मोठा अपघात झाला आहे. चंदननगर जकात नाका येथे सिग्नल वर थांबलेल्या मोटरसायकला ट्रकने मागून जोरात धडक दिली.

Sandip Kapde

Pune Accident News:

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री खराडी बायपास जकात नाक्याजवळ घडली. यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आदिल शेख आणि पाहद शेख (दोघे रा. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते पुण्यातील वाघोली येथील रायसोनी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चालकास ताब्यात घेतले असून, त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा वाघोलीतून ट्रक घेऊन चंदननगरच्या दिशेने निघाला होता. या भरधाव ट्रकने जकात नाक्याजवळ रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली.

ट्रकने दुचाकीवरील तिघांना सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यात आदिल आणि पाहद गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आदिल आणि पाहद यांचा मित्र अफान शेखला गावी जायचे होते. त्यामुळे ते दोघे त्याला पुणे स्टेशनला सोडविण्यासाठी निघाले होते. यात अफानही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  Pune Accident News

पोर्शे अपघाताने देशात खळबळ -

पुण्यातील रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याशी छेडछाड करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT