Pune Accident News Sakal
पुणे

Pune Accident : रूग्णवाहीकेने चिरडलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालका विरूध्द गुन्हा दाखल.,घटना सीसीटीव्हीत कैद

ओतूर पोलीसानी रूग्णवाहीका चालक कुणाल तुकाराम डुंबरे रा.डुंबरवाडी, ता.जुन्नर वर गुन्हा दाखल केला

पराग जगताप

ओतूर : जुन्नर येथील बसस्थानकावर रूग्णवाहीका वळवताना रूग्ण वाहिके खाली एक वृध्द चिरडला गेला असून त्याचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्य झाला आहे. हा अपघात १ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान ओतूर बसस्थानकात झाला असून या अपघातात रज्जाक मगन मुंढे वय.६५ रा.ओतूर,ता.जुन्नर मयत झाले आहे.

ओतूर पोलीसानी रूग्णवाहीका चालक कुणाल तुकाराम डुंबरे रा.डुंबरवाडी, ता.जुन्नर वर गुन्हा दाखल केला आहे.सदर अपघातात बाबत जमिर बाबुलाल मुंढे रा.घोडेगाव ता.आंबेगाव यांनी ओतूर पोलीसात फिर्याद दिली आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व तपासी अंमलदार दत्तात्रय पळपाडे यांनी माहिती दिली की एक जुलै रोजी डुंबरवाडी टोलनाक्यावरील रूग्णवाहिका चालक ओतूर बसस्थानकावर काही कामा निमित्त येऊन गाडी पार्क करून परत रूग्णावाहीका वळवून नेत असताना मागच्या बाजूने मागे पायी चाललेल्या रज्जाक मुंढे यांना धडक देवून खाली पाडून त्यांना रूग्णवाहिकेने दोनदा चिरडले.

त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यानंतर त्याना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात व नंतर पुणे येथील ससुन या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा सहा जुलै ला मृत्यू झाला.

याबाबत ओतूर पोलीसात रविवारी नऊ तारखेला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.तसेच या अपघाताचे सी सी टि व्ही फुटेज ही समोर आले आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दत्तात्रय पळपाडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT