Accident
Accident Sakal
पुणे

Pune : मार्निंग वाॅक साठी गेलेल्या दोघींचा अपघाती मृत्यू

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : जंक्शन (ता.इंदापूर) येथे पोलिस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांनी धडक देवून चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अपघातामध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांचा मृत्यू झाला. जंक्शन,आनंदनगरमधील मधील अनेक नागरिक सकाळी मार्निंग वाॅक साठी बारामती-इंदापूर व जंक्शन - वालचंदनगर रस्त्याने फिरत असतात.

तसेच अनेक जण नीरा डाव्या कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेने ही जात असतात. सध्या बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे.जंक्शन चौकामध्ये ही काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये -जा करीत आहेत.

आज बुधवार (ता.२२) रोजी सकाळी सात च्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत असताना भरधाव वेगाने आलेल्या अजवड वाहनाने पाठीमागून ठोस दिल्याने अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता शिंदे जखमी झाल्या होत्या.

त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरु असतान मृत्यू झाला.अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते.अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

दोघी मैत्रींनीचा दुर्देवी अंत...

अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी मैत्रीण होत्या.दररोज नियमित माॅर्निंग वॉक साठी फिरायला जात होत्या.त्यांच्याबरोबर त्यांची दररोज एक मैत्रीण असायची. मात्र आज ती गेली नव्हती. दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परीसरावरती शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT