पुणे

मार्केट यार्डात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

CD

मार्केट यार्ड, ता. २२ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोऱ्यांचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास मे. जगदीश पायगुडे यांच्या गाळ्यावरील रोकडपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बाजार समिती प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. बाजार समितीने विविध सुरक्षा एजन्सीजना कंत्राट दिले आहेत. मात्र सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचा आरोप सातत्याने व्यापारी, आडते आणि पूना मर्चंट्स चेंबर करत आहे. हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असून देखील आणि बाजारात अनेक सुरक्षा एजन्सींचे सुरक्षा रक्षक कामावर असताना चोऱ्या होतातच कशा, असा प्रश्‍न बाजार घटक उपस्थित करत आहेत.

सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांबाबत बाजार समिती प्रशासन आणि सुरक्षा एजन्सी यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत झालेली चोरीची रक्कम सुरक्षा एजन्सीकडून वसुल करण्याचे ठरले होते. एजन्सीने पैसे न दिल्यास बाजार समिती प्रशासनाने चोरांना जेरबंद करून, पैसे वसुल करून आमचे पैसे द्यावेत.
- सचिन पायगुडे, (तक्रारदार), अडतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती

अडत्यांनी आपल्या जवळील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवजाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास केला जाईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, पण दुर्दैवाने ही जबाबदारी माझ्यावर आली - देवेंद्र फडणवीस

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

Shegaon Temple: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावातील श्रींचे मंदिर भक्तांसाठी राहणार बंद; सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी!

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

SCROLL FOR NEXT