ajit dada sakal
पुणे

Pune : कापुरव्होळ येथे अजित पवार यांचे स्वागत,एकच वादा अजित दादा` चा जयघोष

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुरंदर तालुकाध्यक्ष वामनतात्या जगताप,मुळशीतील राजाभाऊ हगवणे,माऊली कांबळे,हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर - कोल्हापुरला निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महामार्गावर भोर तालुक्यात कापुरव्होळ येथे विक्रमदादा खुटवड युवा मंचच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येऊन फुलांची उधळण करत एकच वादा अजित दादा या घोषणेचा जय घोष करण्यात आला.

राज्यातील राजकारणातील बदललेल्या भुमिके नंतर अजित पवार प्रथमच भोर तालुक्यात येत होते भोर वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे शिवापुर टोलनाक्यावर जंगी स्वागत झाल्यावर राष्ट्रवादीचे तालुक्यातील युवानेते विक्रम खुटवड यांनी देखिल युवामंचच्या वतीने कापुरव्होळ येथे त्यांचे जोरदार स्वागत केले

या वेळी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महामार्गाच्या दुतर्फा जमलेल्या नागरीकांनी तसेच कार्यकर्त्यांनी अजितदादा यांच्यावर पुष्पवृष्टी केली क्रेन ला लावण्यात आलेल्या मोठ्या गुलाबाच्या हाराने तसेच फरची टोपी व भरजरी शाल घालुन विक्रम खुटवड यांनी अजित पवार यांचे स्वागत केले.

पुण्यातील स्वागत कार्यक्रम व महामार्गवर जागोजाग होत असलेले स्वागत यामुळे पवार यांना यायला बराच उशीर झाला होता सकाळी साडे नऊ वाजताचा कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता झाला तरी देखिल कार्यकर्ते व नागरीक स्वागतासाठी थांबुन होते उशीर झाल्याने अजित दादांनी थांबुन बोलणे टाळले परंतु स्वागता बद्दल सर्वांचे मनपुर्वक अभार मानतो आहे असे प्रेम कायम राहु द्या असा संदेश त्यांनी उपस्थितांसाठी विक्रम खुटवड यांच्या जवळ दिला व सर्वांना अभिवादन करत मार्गस्थ झाले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुरंदर तालुकाध्यक्ष वामनतात्या जगताप,मुळशीतील राजाभाऊ हगवणे,माऊली कांबळे,हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विक्रम खुटवड यांनी समारोप प्रंसगी बोलताना दादांनी मोठ्या उत्साहात स्वगताचा स्विकार केला याचा आम्हाला आनंद आहे वेळे अभावी दादांनी बोलण्यासाठी न थांबता उपस्थितांचे अभार मानुन असेच प्रेम कायम ठेवा असा संदेश माझ्याकडे दिला आहे. असे सांगुन खुटवड यांनी युवामंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन स्वागताची जय्यत तयारी केली त्यांचे तसेच उपस्थित सर्व नागरीकांचे त्यांनी अभार मानले.

युवा मंचचे अध्यक्ष समिर धुमाळ,नुथुराम गायकवाड,धनेश डिंबळे,सचिन सोंडकर,महेंद्र भोरडे,गणेश मालुसरे, राहुल गाडे,शुभम गाडे,सागर गाडे,आप्पा शेलार,निलेश लेकावळे,भरत बोबडे,महेश मालुसरे,माऊली राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT