Eunuch Agitation Sakal
पुणे

Agitation : आक्षेपार्ह पोस्टवरून तृतीयपंथीय आक्रमक; नीतेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तृतीयपंथीयांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टवरून आक्रमक झालेल्या तृतीयपंथीयांनी बंडगार्डन पोलिस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तृतीयपंथीयांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टवरून आक्रमक झालेल्या तृतीयपंथीयांनी बंडगार्डन पोलिस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. तृतीयपंथीयांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे पोलिस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाली. या वेळी पोलिसांनी तृतीयपंथीयांना फरफटत नेले.

आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी तृतीयपंथींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात तृतीपंथीयांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी रात्री उशिरा ठिय्या आंदोलन सुरू केले. नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

परंतु गुन्हा दाखल होत नसल्यामुळे तृतीपंथीयांनी आक्रमक होत बुधवारी बंडगार्डन चौकातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून दूर करताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. महिला पोलिसांनी तृतीपंथीयांना अक्षरशः फरफटत नेत पोलिस ठाण्यात नेले.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दरम्यान, तृतीयपंथीयांनी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात एकत्र येत राणेंच्या ट्विटचा निषेध केला. तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेला समुदाय स्वत:च्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. अशा वेळी हे नेते आमची बाजू घेताना दिसत नाहीत. याउलट तृतीयपंथी शब्दाचा वापर करतात. यातून त्यांचे मागासलेले विचार आणि मानसिकता दिसून येते.

- शमिभा पाटील (राज्य समन्वयक तृतीयपंथी हक्क संघर्ष समिती).

आंदोलनस्थळी भेट देवून तृतीयपंथीयांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यांचे निवेदन मुंबई शहर पोलिस दलाकडे पाठविण्यात येणार आहे.

- प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त.

सुषमा अंधारे, सुजात आंबेडकर आंदोलनस्थळी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्यासह काही पदाधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी तृतीयपंथींना पाठिंबा देत राणेंविरोधात गुन्हा दाखल का होत नाही, याबाबत पोलिसांना विचारणा केली.

तृतीयपंथी हक्क संघर्ष समिती आक्रमक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत हिणवल्याने तृतीयपंथीय हक्क संघर्ष समिती राणेंविरोधात आक्रमक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT