COVID_quarantine
COVID_quarantine 
पुणे

पुणे : क्वारंटाइन सेंटरमधून तरुणीचा पळून जाण्याचा प्रयत्न; पण घडलं भलतचं! 

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नागरिक प्रशासनाला सहकार्य करताना दिसत नाहीत. याच ताज उदाहरण म्हणजे सोमवारी शहरातील क्वारंटाइन सेंटरमधून (Quarantine centre) एका तरुणीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तिला एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागलं. प्रशासनासाठी देखील तिचा हा प्रयत्न डोकेदुखी ठरला. 

पुण्यातील एरंडवणे (Erandwane) भागातील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका १८ वर्षीय मुलीनं सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी खिडकीतून खाली उतरण्याचा तिचा विचार होता. मात्र, तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तिला एका वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागलं. ज्या खिडकीतून तिला खाली उतरायच होतं त्या खिडकीच्या गजांमधील मोकळ्या जागेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ती यामध्ये अडकून पडली. अनेकांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणालाही ते जमलं नाही. अनेक प्रयत्नानंतर अखेर अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले. यानंतर खिडकीचे गज कापून या मुलीची सुटका करण्यात आली.  

तरुणीच्या या पळून जाण्याच्या प्रयत्नामुळे तिच्यासह अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. ही तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाली असतील तर कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब ठरली असती तसेच जर ती अपघातग्रस्त झाली असती तर प्रशासनासाठी गंभीर बाब ठरु शकली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Storage : पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2024

Monsoon : केरळमध्ये ३१ मे रोजी मॉन्सून होणार दाखल

Sakal Vastu Expo : स्वप्नातील घर आता सत्यात अवतरणार

Illegal Hoarding : पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्य होर्डिंग्ज ठरताहेत ‘काळ’

SCROLL FOR NEXT