polio dose Sakal
पुणे

पुणे : बाळाला उद्या पोलिओचा डोस द्याच

पुणे महापालिकेने शहरात सुमारे १४०० केंद्रांवर याची व्यवस्था केली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या (ता. २७) शहरातील शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांना पोलिस लसीकरण केले जाणार आहे. यासाठी पुणे महापालिकेने शहरात सुमारे १४०० केंद्रांवर याची व्यवस्था केली आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम-२०२२ राबविण्यासाठी पुणे महापालिकेत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य प्रमुख डाॅ. आशिष भारती ,सहाय्यक आरोग्य अधिकारी (राष्ट्रीय कार्यक्रम) डॉ. वैशाली जाधव लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ.राजेश दिघे, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रभागात एकूण १४०० पोलिओ केंद्र निश्‍चीत केले आहेत. या मोहिमेमध्ये ० ते ५ वर्ष वयोगटातील सुमारे ३ लाख ११ हजार लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बूथ कार्यरत राहणार आहे. या मोहिमेसाठी ४ हजार ५५ स्वयंसेवक ,२८० पर्यवेक्षक, १५ मुख्य पर्यवेक्षक, पुणे महापालिकेचे ९० डॉक्टर्स, ५ विभागीय अधिकारी, पुणे महानगरपालिकेच्या नर्सेस व इतर कर्मचारी व्यतिरिक्त खासगी डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, रोटरीयन्स, नर्सेस कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व्यतिरिक्त महिला बालविकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक, आशावर्कर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या हद्दीतील वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणी बालकांना लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच रविवारी ज्या बालकांना लस घेता आली नाही, अशांसाठी पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे.

बालकांना पोलिओ लसीचे २ थेंब देऊन मोहीम १००% यशस्वी करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ, आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT