पुणे

पुणे–बंगळूर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका; वाहनचालक त्रस्त

CD

महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे धोका

आनेवाडी टोल नाक्याजवळची स्थिती; अपघातांची मालिका, वाहनचालक त्रस्त

आनेवाडी, ता. २२ : पुणे- बंगळूर महामार्गावरील रस्ता नव्याने डांबरीकरणासाठी काही दिवसांपूर्वी उखडण्यात आला आहे. मात्र, कामाला विलंब होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे, सैल खडी व धुळीमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावरील डांबरी थर काढून टाकल्यानंतर तो बराच काळ उघडाच ठेवण्यात आल्याने ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, या मार्गावर लहान- मोठे अपघात वारंवार घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. काही दिवसांत किरकोळ जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून, गंभीर अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने हा प्रकार घडत आहे. काम सुरू असताना पुरेशी सूचना फलक, वळणदर्शक फलक किंवा रात्रीसाठी परावर्तक दिवे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपरिचित वाहनचालकांना अचानक खड्डे किंवा उखडलेला भाग दिसून अपघाताचा धोका वाढत आहे.
याशिवाय, उखडलेली डांबरी खडी योग्यरीत्या हटविण्याऐवजी ती रस्त्याच्या कडेला टाकून ठेवण्यात आली असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. काही नागरिकांनी या खडीच्या विक्रीबाबतही शंका उपस्थित केली असून, या कामांमध्ये आर्थिक अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. दरवर्षी अशा प्रकारे रस्ता उखडणे व नव्याने काम काढणे, यामागे आर्थिक तडजोडींचा संशय व्यक्त होत आहे.
--------------------------
आंदोलनाचा इशारा

वाहनचालक व ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अपघात टाळण्यासाठी तात्पुरती दुरुस्ती, सूचना फलक व सुरक्षिततेची उपाययोजना त्वरित करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. रखडलेल्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
----------------------------
02388
आनेवाडी : टोल नाक्याजवळ पुणे- बंगळूर महामार्गावरील उखडलेल्या खडीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT