राज्यपाल भगतसिंह कोश्यारी sakal
पुणे

तत्वज्ञानाचे व्यावहारिक आचरण आवश्यक : भगतसिंह कोश्यारी

विद्यापीठात आयोजित, जैन तत्वज्ञानावर आधारित ‘उपासकदशा’या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतात जैन, बौद्ध, शिख, वैदिक आदी पंथाचे अनेक संत होऊन गेले. ते केवळ संबंधित पंथाचे मार्गदर्शक नाही, तर संपूर्ण भारतीयांचे आदरस्थानी आहे. या संतांनी लोकांच्या भाषेत आपले विचार मांडले. म्हणून खऱ्या अर्थाने हे तत्वज्ञान व्यावहारिक आचरणात आणणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

विद्यापीठात आयोजित, जैन तत्वज्ञानावर आधारित ‘उपासकदशा’या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, जैन तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. शैलेश गुजर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुस्तकाच्या लेखिका आणि सेठ हिराचंद नेमचंद अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विमल बाफना आदी उपस्थित होते.

भगवान महावीरांच्या अर्धमागधी भाषेतील १२ आगमन ग्रंथांपैकी सातव्या क्रमांकाच्या ‘उवासगदसाओ’ या ग्रंथाचे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’ या ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आले आहे.

डॉ. बाफणा म्हणाल्या,‘‘भगवान महावीरांच्या बारा वर्षांच्या तपस्येनंतर त्यांनी जे तत्वज्ञान जगाला दिले. ते या आगमणांच्या रूपाने समोर आले. अध्यासनाच्या माध्यमातून आगमन ग्रंथांपैकी एकाचे भाषांतर झाले आहे. आजच्या आधुनिक युगातही हे तत्वज्ञान उपयोगाचे आहे. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणिवेचे भान या ग्रंथांतून होते.’’

मराठीत जैन तत्वज्ञानावरील लेखनाची मोठी परंपरा असून, डॉ. बाफणांच्या रूपाने यात अधिकच भर पडली आहे, असे डॉ. निरगुडकर म्हणाले. विद्यापीठाच्या मुद्रणालयात या पुस्तकाची छपाई करण्यात आली असून, पुस्तकाची बांधणी आणि छपाई कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रितेशचा फस्ट लूक समोर, वाढदिवसादिवशी पोस्ट करत म्हणाला, 'क्षणभर थांबलेला सूर्य आणि...'

Ind vs SA 4th T20 : मालिका विजयासाठी भारताला विजय आवश्यक; सॅमसनला आज तरी मिळेल का संधी? कशी असेल प्लेईंग XI?

VIDEO : 15 वर्षांच्या संसाराचा अंत? हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पत्नी सापडली रंगेहाथ; पती रडत रडत म्हणाला, 'दुपारी ३:३० च्या सुमारास..'

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

SCROLL FOR NEXT