pune sakaL
पुणे

Pune : पिंपरखेड येथे 'भीमाशंकर'च्या बाजारभावाचे स्वागत ; एकमेकांना पेढे भरवून केला आनंद व्यक्त

३५० रुपयांच्या हप्त्यामधून ५० रुपये कपात करून शेतक-यांना मात्र ३०० रुपये एवढाच हप्ता मिळणार

सकाळ वृत्तसेवा

पाबळ - भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून उसाचा अंतिम दर ३ हजार १०० नुकताच जाहीर करण्यात आला. दरम्यान यामध्ये उसाचा दुसरा हफ्ता ३५० रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.

३५० रुपयांच्या हप्त्यामधून ५० रुपये कपात करून शेतक-यांना मात्र ३०० रुपये एवढाच हप्ता मिळणार असल्याने पिंपरखेड (ता.शिरूर) येथे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व काही शेतकऱ्यांकडून सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या फोटो पोस्टरचे दहन करत निषेध व्यक्त केला होता. मात्र, याउलट पिंपरखेड येथे भीमाशंकर कारखान्याकडून मिळालेल्या बाजारभावाचे स्वागत करून शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. याआधीच्या वर्षांपेक्षा मिळालेला ३ हजार १०० रूपये बाजारभाव चांगल्या स्वरूपाचा असून आम्ही समाधानी असल्याचे यावेळी उपस्थित शेतक-यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सरपंच राजेंद्र दाभाडे, माजी सभापती बाळशीराम ढोमे, माजी सरपंच बिपीन थिटे, किरण ढोमे, दामू दाभाडे, रामदास ढोमे, खरेदी विक्री संघाचे संचालक संपत पानमंद, भाऊसाहेब बोंबे, माजी सरपंच दिलिप बोंबे, अंकुश दाभाडे,बाळासाहेब बोंबे, किशोर दाभाडे, नरेश ढोमे, पोपट बोंबे, अप्पा गायकवाड, जयवंत बोंबे, उद्धव रोकडे, बाबुराव राक्षे, तसेच काठापूर, चांडोह येथील ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

"भीमाशंकर कारखाना परिसरातील शेतकरी कारखाना उभा राहील्यापासून सुजलाम - सुफलाम झाला आहे. कारखाना यापूर्वी देखील चांगला बाजारभाव देत होता आणि यापुढे देखील चांगला बाजारभाव मिळणार आहे."

बिपीन थिटे

माजी सरपंच काठापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT