Pune Crime News Sakal
पुणे

Pune Crime News: बिबवेवाडीतील टोळी प्रमुखासह चौघांवर मोका

बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार योगेश रमेश जगधने याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार योगेश रमेश जगधने (वय २६ , रा. शेंडकर चाळ, गणपतनगर, पापळ वस्ती, बिबवेवाडी) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

योगेश जगधने हा टोळी प्रमुख असून, त्याच्या इतर साथीदारांमध्ये उमेश रमेश जगधने (वय ३१, रा. शेंडकर चाळ, पापळ वस्ती, बिबवेवाडी), विकास ऊर्फ सोन्या गंगाराम राठोड, (वय २३, रा. प्रसाद बिबवेनगर, बिबवेवाडी) आणि अन्य एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

त्यांच्यावर लोकांमध्ये दहशत परसवणे, खुनाचा प्रयत्न, हत्याराचा धाक दाखवून दरोडा घालणे, दरोड्याची पूर्वतयारी, गंभीर दुखापत करणे, शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी, जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव सादर केला होता.

या प्रकरणाची छाननी करून त्यांनी आरोपींविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT