Mocca crime Sakal
पुणे

Mocca Crime : बिबवेवाडीतील गुन्हेगारी टोळीवर मोका कारवाई

बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत कोंढरे याच्यासह टोळीतील चारजणांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत कोंढरे याच्यासह टोळीतील चारजणांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे.

पुणे - बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत कोंढरे याच्यासह टोळीतील चारजणांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार घेतल्यापासून आतापर्यंत गुन्हेगारी टोळ्यांवरील ११ वी कारवाई आहे.

अनिकेत ऊर्फ अंड्या विजय कोंढरे (वय २२), रितेश विजय कोंढरे (वय २४, दोघे रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), अंकित ऊर्फ अभिषेक सोमा (वय २४, रा. श्रीनाथ टेरेस, साईनगर, कोंढवा बुद्रूक), विशाल लक्ष्मण रेणुसे (वय २२, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. रितेश कोंढरे आणि विशाल रेणुसे या दोघांना अटक केली आहे.

या टोळीने गेल्या २१ डिसेंबर रोजी बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करून एका फिर्यादीच्या डोक्यात हत्याराने वार केले होते. तसेच, त्यांच्या घरावर लाक्षा मारून खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. टोळीप्रमुख अनिकेत कोंढरे आणि त्याच्या साथीदारांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी कोंढरे आणि साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त यांच्याकडे दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT