पुणे, ता. ११ ः धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील एका धर्मगुरूवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कायद्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यात अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंकज जेम देवनूर (वय ५०, मूळ रा. मँचेस्टर, ब्रिटन), तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित राजू भोसले (वय ३१, रा. रामोशी गेट, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले हे रिक्षाचालक आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ब्रिटनहून आलेल्या धर्मगुरूंचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात हिंदू देवदेवतांविषयी भ्रम निर्माण करण्यात आला. ‘येशूचे नाव घेऊन धर्मगुरूने अंधश्रद्धा पसरविली. येशूमुुळे पाऊस पडतो, आजार बरे होतात,’ असे धर्मगुरूने प्रवचनात सांगितले. नागरिकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी आकर्षित केले,’ असे भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. धर्मगुरूवर परदेशी नागरिक कायदा कलम २०२५, तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.