BRT sakal
पुणे

Metro and BRT : मेट्रोच्या कामावर ‘बीआरटी’चे भवितव्य

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची महापालिका प्रशासन व पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची महापालिका प्रशासन व पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे.

पुणे - नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची महापालिका प्रशासन व पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली आहे. पीएमपी त्याबाबतचा अभिप्राय नोंदवून संबंधित अहवाल महापालिका प्रशासनाकडे देणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका त्यावर निर्णय घेणार आहे. दरम्यान, नगर रस्त्यावरील मेट्रोच्या कामावर बीआरटीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तसेच या प्रश्‍नाबाबत मध्यम मार्ग निघण्याची शक्‍यता आहे.

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याबाबत सातत्याने टीका होत आहे. संबंधित प्रश्‍नाची दखल घेत आमदार सुनील टिंगरे यांनी हा प्रश्‍न अधिवेशनात उपस्थित केला होता. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संबंधित रस्त्याची पाहणी करून बीआरटीविरोधात भाष्य केले होते. संबंधित बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याबरोबरच पावसाच्या पाण्यालाही अडथळा येत आहे. बीआरटी मार्गातच मेट्रो मार्गाचेही खांब येणार आहेत, असा प्रश्‍न बीआरटीबाबत उपस्थित केला जात आहेत.

दरम्यान, पीएमपी प्रशासनाने मात्र बीआरटी काढू नये, अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये संबंधित मार्गाविषयी चर्चा झाली होती. त्यानुसार, महापालिका व पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निश्‍चित केले होते, त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली होती.

त्यानुसार, पीएमपीचे मालमत्ता विभागाचे प्रमुख अनंत वाघमारे, बीआरटी मॅनेजर, फिल्ड ऑफिसर तर महापालिका प्रशासनाकडून कार्यकारी अभियंता संजय धाराव, कॉरिडॉर इंजिनिअर यांच्या समितीने बीआरटी मार्गाची पाहणी केली. त्यानंतर आता पीएमपी त्यांचा अभिप्राय नोंदवून त्याबाबतचा अहवाल महापालिकेकडे देणार आहे.

काय शक्यता वर्तविली

  • बीआरटी मार्गामुळे संबंधित रस्त्यावरील पीएमपी बसचा वेग वाढलेला आहे.

  • बीआरटी मार्गावरील बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • सध्या मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे पीएमपी बस अन्य वाहनांसमवेत मुख्य रस्त्यावरून धावते.

  • आगामी दोन-तीन महिन्यात मेट्रोचे काम संपल्यावर बीआरटी पुर्ववत होऊ शकते बीआरटी काढल्यास बसचा वेग पुन्हा कमी होण्याची शक्‍यता.

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पाहणी महापालिका व पीएमपी अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीने केली आहे. पीएमपीचा अभिप्राय घेऊन त्याबाबतचा अहवाल आमच्याकडे येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT