Shivsena
Shivsena Esakal
पुणे

Kasaba Bypoll Election : "शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी नाही" उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

सकाळ डिजिटल टीम

Kasaba Bypoll Election : कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कसबा पोटनिवडणूक शिवसेना लढवणार हे निश्चित झालं आहे. या पोटनिवडणूकीसाठी इच्छुकांची नावे समोर आली असून, इच्छुकांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये कुठली ही बिघडी होणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांची आहे.

हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

कसबा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं म्हणत शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी विश्वास दाखवला आहे. कसबा पेठ मधील मतदार शिवसैनिक असतील, शहरातील शिवसैनिक यांनी कसबा लढवण्याची इच्छा उध्दव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. शहर अध्यक्ष संजय मोरे, उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका अशी ४ ते ५ कसबा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील आणि तो निर्णय मान्य करु अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची काल पुण्यात बैठक पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT