पुणे

बाणेरमध्ये कर्करोगग्रस्तांसाठी रुग्णालय

CD

पुणे, ता. १५ ः कर्करोगग्रस्त रुग्णांना एकाच छताखाली सर्वसमावेशक उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेकडून बाणेरमध्ये अद्ययावत सोयी-सुविधा व तंत्रज्ञानयुक्त रुग्णालय उभारण्यात आले आहे. संबंधित रुग्णालय सार्वजनिक खासगी तत्त्वावर (पीपीपी) चालविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे.
महापालिकेने १४.८५ कोटी रुपये इतका निधी कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी देण्यात आला होता. या निधीद्वारे बाणेर येथे संबंधित रुग्णालय उभारण्यात आले आहे. पुणे महापालिका व आपुलकी हेल्थकेअर यांच्या वतीने संबंधित रुग्णालय चालविले जाणार आहे. दरम्यान, रविवारी (ता. १७) दुपारी साडेबारा वाजता रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या रुग्णालयातून गरीब आणि गरजू रुग्णांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतून (सीजीएचएस) सवलतीच्या दरात परवडणारे उपचार दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT