Pune Cantonment Board Voter List
Pune Cantonment Board Voter List Sakal
पुणे

Voter List : पुणे कँटोन्मेंट बोर्ड मतदार यादीत सुमारे 5 हजार ३६ नवीन नावे समाविष्ट

मोहिनी मोहिते

30 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 मार्च रोजी अंतिम होणार्‍या पुणे कॅन्टोन्मेंट मतदार यादीत अंदाजे 5 हजार 36 नवीन नावे समाविष्ट होणार आहे.

कॅन्टोन्मंट - 30 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 मार्च रोजी अंतिम होणार्‍या पुणे कॅन्टोन्मेंट मतदार यादीत अंदाजे 5 हजार 36 नवीन नावे समाविष्ट होणार आहे. लष्करातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह किमान 4,000 नावांसह नवीन मतदारांची सुमारे 1036 नावांचा समावेश करण्यात आला. यावेळी अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांनी बोर्ड कार्यालयात एकच गर्दी केली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपली मतदार नोंदणी मोहीम लष्करी भागात पूर्ण केली आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, मिलिटरी इंटेलिजेंस ट्रेनिंग स्कूल आणि डेपोसह सैन्य युनिट्स आणि प्रशिक्षण आस्थापनांना मतदार नोंदणी फॉर्म वितरित केले. मतदार नोंदणीसाठी 4,000 लष्करी कर्मचार्‍यांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची छाननी सुरू आहोत,' असे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्ट. कर्नल विकास सावलगे यांनी सांगितले.

लष्करी भागात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना लष्करी भागात प्रचारासाठी विशेष परवानगी दिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गहाळ नावांची सुनावणी

1555 नागरिकांनी मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या पॅनेलने सुमारे त्यापैकी पहिल्या दिवशी ८५० अर्जदार/नागरिकांची सुनावणी सुरू केली आहे, ज्यांची नावे पूर्वीच्या प्रकाशित मतदार यादीतून गायब झाली होती. तसेच 365 अर्जदार अपीलात गेले आहे.

प्रभाग १ मधील अर्जदार, 3, 4 आणि 5 यांना दिनांक १३ रोजी सोमवारी सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी 809 प्राप्त झालेल्या अर्जापैकी 539 नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. आज दिनांक १४ रोजी मंगळवारी, प्रभाग 2, 6, 7 आणि 8 मधील नागरिक दुसऱ्या सुनावणी सत्रासाठी हजर झाले होते. यावेळी एकूण 1036 नावे यादीत समाविष्ट करण्यात आली.

पडताळणी दरम्यान, कॅन्टोन्मेंट अधिकार्‍यांना आढळले की काही अर्जदार पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत गेले आहेत. पण त्यांच्याकडे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत घरे आहेत. म्हणून त्यांना त्यांची नावे नोंदवायची आहेत,

काही सीलबंद मालमत्तेवर राहत आहेत. एका प्रकरणात ३८ लोक राहतात. बंगल्याच्या जागेवर त्यांनी नोंदणीसाठी अर्जही केला. मात्र ते अतिक्रमण करणारे आहेत. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT