highway sakal
पुणे

Pune : पहिल्याच टप्प्यात चार नवीन ‘उड्डाणपूल’; पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची क्षमता वाढविण्याचे नियोजन

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून पुणे-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे-बंगळूर या दोन ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची क्षमता वाढविण्याबरोबरच नव्याने पुणे-छत्रपती संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉरची उभारणी करणे, अशी दोन्ही कामे स्वतंत्रपणे हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही दोन्ही कामे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएसआयडीसी) देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जुन्या महामार्गावर चार नवीन उड्डाणपूल आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून पुणे-छत्रपती संभाजीनगर आणि पुणे-बंगळूर या दोन ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

या कंपन्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याचे आरेखन करून सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू होते. त्यानुसार सल्लागार कंपनीकडून प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला. असे असताना सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारडून ‘एमएसआयडीसी’ची स्थापना करण्यात आली.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे काम ‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला. सध्या असलेल्या पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. मध्यंतरी एमएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यात एकत्रित बैठक झाली. त्यामध्ये ग्रीन कॉरिडॉरसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागेल.

त्यामुळे सध्या जुन्या महामार्गाची क्षमता वाढविण्याला प्राधान्य द्यावे. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जुन्या महामार्गाच्या सक्षमीकरणाच्या कामाचा आराखडा तयार करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT