Pune Cime  sakal
पुणे

Pune Cime : मंचर येथील सेवानिवृत्त पोलीस अमलदार पंढरीनाथ थोरात खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक

तपासी पोलीस अधिकारी भालेकर म्हणाले की आरोपीने गुन्ह्याचे कृत्य केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतःचा नित्यक्रम सुरु ठेवला होता. त्यामुळे आरोपीचा शोध लावणे अवघड जात होते.

डी.के. वळसे पाटील

Pune Crime - पुणे ग्रामीण पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पोलीस अंमलदार पंढरीनाथ बाबुराव थोरात ( वय ७३ रा. मंचर मुळेवाडी रस्ता माळवाडी ता.आंबेगाव) यांचा खून पैशाच्या देवाण घेवान व्यवहारातून झाल्याचे मंचर पोलीसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून आढळून आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी २४ तासात या गुन्हाचा छडा लावला आहे. मच्छिंद्र पांडु गुंजाळ ,( वय ५५ रा. मुळेवाडी रस्ता, मंचर, ता. आंबेगाव ) याला अटक करण्यात आली आहे. घोडेगाव न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी दिला आहे. आरोपीला गुरुवार (ता.२२) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान पोलीस खात्यातीलच थोरात यांचा शुक्रवारी (ता.१६) डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह विहिरीत टाकून दिला होता. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे मंचर शहरासह पोलीस खात्यातही खळबळ उडाली होती.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी या प्रकरणी लक्ष देऊन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना गुन्ह्याविषयी मार्गदर्शन केले.

तपासी पोलीस अधिकारी भालेकर म्हणाले की आरोपीने गुन्ह्याचे कृत्य केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून स्वतःचा नित्यक्रम सुरु ठेवला होता. त्यामुळे आरोपीचा शोध लावणे अवघड जात होते.

पोलीसांनी काही खबरयाचाही उपयोग केला. पोलीस तपास पथकातील संजय नाडेकर, सुदर्शन माताडे , योगेश रोडे , अजित पवार, संदीप रावते यांनी तपासासाठी मोबाईल लोकेशन व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. अनेकांकडे चौकशी केली. त्यांनतर आरोपी गुंजाळ ला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर आरोपीने खुनाची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: दादा गेले, बारामतीत पोहचताच सुनेत्रा पवार यांचा आक्रोश Video

Ajit Pawar Death: वराळेचा कार्यक्रम ठरला अजितदादांचा खेड तालुक्यातील अखेरचा कार्यक्रम!

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Death:अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच बाजार पेठ बंद: मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय!

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

SCROLL FOR NEXT