पुणे

पुणेकराच्या "कोविड कवच' ऍपचा कोरोना औषधांच्या चाचणीसाठी वापर

सकाळवृत्तसेवा

पुणे - औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने संकलित करण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी "कोविड कवच' नावाचे ऍप विकसित केले आहे. आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) पुढाकारातून विकसित करण्यात आलेले हे ऍप, कोरोना उपचारातील आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्यांसाठी वापरण्यात येणार आहे. 

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ)द्वारे आयोजित "इंजिनिअरिंग एक्‍सेलंस ऍवॉर्ड'चे विजेते दिमाख सहस्रबुद्धे यांनी हे ऍप विकसित केले आहे. पुण्याच्या ऱ्हुमोटाईड आजार केंद्राचे (सीआरडी) संचालक डॉ. अरविंद चोप्रा यांच्या संकल्पनेतून हे ऍप निर्माण झाले आहे. ऍपद्वारे दररोज व्यक्तीच्या लक्षणांचे निरीक्षण आणि निदान चाचणीत "रिअल टाईम डेटा' उपलब्ध करून देणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यरकीय ज्ञानाच्या संकरातून एक उत्तम उत्पादन समोर आले आहे. 

काय आहे ऍप? 
औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या दररोजच्या आरोग्याची माहिती संकलित करणारे हे एक मोबाईल ऍप आहे. यामध्ये ऍप धारक रोज स्वतःच्या लक्षणांची (ताप, सर्दी-खोकला, आदी) नोंद करू शकतात. त्यामुळे डॉक्‍टरांना रोज भेट देण्याची गरज नाही. संकलित माहितीचे पृत्थक्करण केल्यानंतर त्या आधारे निष्कर्ष काढणे सहज शक्‍य. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऍपची वैशिष्ट्ये 
- ऍप धारकाची वैयक्तिक माहिती गोपनीय 
- डॉक्‍टरांचा वेळ वाचणार आणि रूग्णाशी रोज संपर्क राहणार 
- रिमोट पद्धतीने रुग्णावर पाळत ठेवणे शक्‍य 
- तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित 
- कोरोनासोबत इतर संसर्गजन्य आजारांसाठी वापरणे शक्‍य 

समाजातील कोरोना रुग्णांवर पाळत ठेवणे सोपे होते. ज्यामुळे औषधोपचाराची नियमावली सुधारणे, लवकरात लवकर निदान करणे व आवश्‍यक उपचार देणे शक्‍य होणार आहे. अभ्यासाचे विश्‍लेषण काढण्यास सोईस्कर असे ऍपचे डिझाईन करण्यात आले आहे. 
- डॉ. अरविंद चोप्रा, संचालक, सीआरडी. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोविड कवच ऍपमध्ये 100 टक्के गोपनीयतेची काळजी घेतली जाते. रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील संवाद हा केवळ त्यांच्यातच राहील. सध्या या ऍपचे दुसऱ्या स्तरावरील परीक्षण झाले आहे. 
- दिमाख सहस्रबुद्धे, अविश्‍कारकर्ता 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT