temperature sakal
पुणे

Pune Temperature : पुणे शहर व परिसरात उन्हाचा चटका कायम

पुणे शहर व परिसरात आकाश दिवसभर निरभ्र राहणार असून, या काळात उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर व परिसरात आकाश दिवसभर निरभ्र राहणार असून, या काळात उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

आठवडाभरापासून पुण्यासह राज्यभरातच उन्हाची तीव्रता वाढत असून, शहरातील कमाल तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जात आहे. बुधवारी शहरातील कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुढील काही दिवस शहरातीत कमाल तापमान याच दरम्यान राहील. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांनी दुपारी बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. मात्र पारा चाळिशी पार असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १८) कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT