Elgar_Parishad 
पुणे

मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे पोलिसांनी 31 डिसेंबरला एल्गार परिषदेच्या आयोजनाची परवानगी नाकारली आहे. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी मिळावी, यासाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्याचीच दखल घेत पुणे पोलिसांनी हा निर्णय दिला आहे. 

स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद आयोजित करण्याचा कोळसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मानस होता. स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत हे ठिकाण येत आहे. त्यामुळे स्वारगेट पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी प्राप्त अर्ज विचारासाठी पुढे वरिष्ठ पोलिसांकडे पाठवला होता. 

तीन वर्षापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषद झाली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळलेला होता. या परिषदेचा संबंध पोलिसांनी त्या हिसांचाराशी जोडला होता. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप झाले होते. एल्गार परिषदेचा आणि कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा संबंध नाही असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील दोन वर्ष एल्गार परिषद झाली नाही. दरम्यान आता सरकार बदलल्यानंतर पुन्हा एल्गार परिषद व्हावी, अशी मागणी कोळसे पाटील यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : परभणीच्या राणीसावरगावमध्ये मतदानावरून गदारोळ; मतदानापासून रोखल्याचा आरोप

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Voting Before Wedding: मतदानाचा हक्क बजावून नवरदेवाची लग्नाकडे धाव; तांबवेतील विक्रम पाटील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत!

SCROLL FOR NEXT