सी.एन.जी पंपावरील गर्दीमुळे नागरिक त्रस्त Sakal
पुणे

पुणे : सी.एन.जी पंपावरील गर्दीमुळे नागरिक त्रस्त

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

महर्षी नगर : गुलटेकडी परिसरातील नेहरू रस्त्यावर असणाऱ्या सी.एन.जी पंपावर रिक्षाचालकांची दिवसभर गर्दी पाहायला मिळाली, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रिक्षाचालकांचे हाल पाहायला मिळाले. तर येथील स्थानिक नागरिकांना देखील याचा आज अधिक त्रास झाला, पंपावरील रांग ही इंदिरा नगर वसाहत पर्यत गेल्याने नागरिकांना सहन करावा लागला. मोठे चारचाकी वाहन आणि सार्वजनिक बस ला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

रस्त्याच्या नजीक असणाऱ्या घरांना त्रास होतो, स्थानिक महिला गुलटेकडी येथील गणपती मंदिरा समोर बसतो, मंदिर आणि घरे यात फार अंतर नाही, सी.एन.जी पंपा मुळे रिक्षाच्या रांगा आमच्या घरा समोर लागतात, आम्हाला याचा दररोज त्रास होतो, आज गर्दी जास्त असल्याने अधिक त्रास झाला. तसेच जागे अभावी अनेक वेळा छोटे मोठे अपघात होतात, वाहतूक पोलिसांनी, पंपचालकांनी स्थानिकांचा विचार करून योग्य ती उपाययोजना करावी - शोभा परदेशी, स्थानिक महिला रहिवासी

स्वारगेट वाहतूक पोलिसांना याबाबत कळविले आहे, आवश्यक सूचना आम्ही रिक्षा चालकांना करत आहोत, शिस्त न पाळणाऱ्या चालकांवर कारवाई साठी वाहन क्रमांक वाहतूक पोलिसांना देणार आहोत. - सागर इंगळे, व्यवस्थापक, सी.एन.जी पंप, गुलटेकडी

इतर सी.एन.जी च्या तुलनेत या पंपावर जलद सेवा मिळते म्हणून या पंपावर गॅस भरण्यासाठी प्राधान्य दिले जाते. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यात कोणताही भेदभाव न करता कारवाई करावी. स्थानिक चालक अरेरावी करत असतील तर त्यांच्या वरही कडक कारवाई करावी - नजिर शेख, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT